तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

Screenshot_2025-11-27-10-46-26-52_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेडराजा (अनिल दराडे) (रूम्हणा-ग्रामपंचायत) जांभोरी बीट,सिंदखेड राजा प्रकल्प येथे ‘संविधान दिन’ मोठ्या संख्येने आणि उत्साहाचा वातावरणात पार पडला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष देवखेड गावचे ग्रामस्थ माजी मुख्याध्यापक श्री. किसन सरकटे सर,प्रमुख पाहुणे चांगेफळचे ॲड.श्री.अमोल शेजूळ,यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.याप्रसंगी श्री.गजानन तायडे,श्री.राजेश काळे,श्री.भानुदास आढाव,श्री.बाबासाहेब आढाव,श्री.प्रकाश खरात (माजी PSI),श्री.माणिक काळे,श्री.प्रकाश उत्तम खरात,श्री.धर्मा खरात,श्री.राजरत्न खरात,जागृती काळे,लक्ष्मी खरात,सुनिता खरात,निर्मला खरात,महाविद्यालयीन विद्यार्थी रितेश बनसोड,विकास भालेराव,अंगणवाडीतील विद्यार्थी कोहिनूर,राजवीर,वेदिका हे सर्व उपस्थित होते याप्रसंगी कार्यक्रमाचे महत्त्व अध्यक्षांनी आपल्या अमूल्य अशा मार्गदर्शनातून समजावून सांगितले आणि संविधानाचे रक्षण करणे,संविधानानुसार आचरण करणे याबद्दल साध्या आणि सोप्या शब्दात मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ॲड.श्री अमोल शेजूळ यांनी संविधान निर्मितीच्या आधीची परिस्थिती आणि संविधान निर्मितीनंतरची परिस्थिती याबद्दल अमूल्य असे मार्गदर्शन करून संविधानाचे महत्त्व अतिशय समर्पक शब्दात समजावून सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका प्रिया तेजकोर प्रकाश खरात यांनी तर आभारप्रदर्शन अंगणवाडी मदतनीस सौ.साधना राजरत्न खरात यांनी केले.या कार्यक्रमाचे सांगता तांदुळवाडी गावातून ‘संविधान रॅली’ काढून करण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अथक परिश्रम घेतले.

You may have missed

error: Content is protected !!