संविधान बहुजन समाजा पर्यंत पोहोचने हि काळाची गरज विनायक भानुसे पाटील यांचे प्रतिपादन
सिंदखेडराजा अनिल दराडे सिंदखेडराजा तालुक्यातील विझोरा येथील संत कबीर सार्वजनिक वाचनालयात आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच पती श्री गणेश भानुसे प्रमुख पाहुणे देऊळगाव यही येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष शिंगणे,विझोरा शाळा समिती अध्यक्ष श्री शिवानंद भानुसे तर माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री योगेश भाऩुशे , जेष्ठ नागरिक भास्कर आंबा भानुसे तर दिनेश म्हस्के बालवाचक प्रतीमोल म्हस्के सर्व मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान उद्देशीके
घ्या प्रतीमचे पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले तर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष श्री विनायक भानुसे पाटील यांनी उद्देशिकेच्या वाचन करून मार्गदर्शन करताना असे म्हटले कि संविधान बहुजन समाजातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचने हि काळाची गरज आहे असे म्हटले तर उपस्थित वाचक वर्ग , वाचनालय चे पदाधिकारी उपस्थित होते, सुत्रसंचलन वाचनालय चे सचिव श्री कडुबा म्हस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ ऊषा म्हस्के यांनी मानले
