चिखली नगरपालिकेच्या प्रभाग क्र.१’बी प्रीती ताई समाधान बांडे-फुलझाडे यांची प्रचारात आघाडी
चिखली- निलेश कोल्ह)चिखली आगामी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून प्रीती समाधान बांडे- फुलझाडे यांच्या प्रभाग क्रमांक १ बी मधून नगरसेविका पदासाठी यांच्या उमेदवारीला चिखली शहरातील प्रभाग क्रमांक १ बी ऐतिहासिक असा प्रतिसाद मिळत आहे नागरिकांनी स्वतःहून प्रचारात उतरून दिलेल्या उर्मीदार साथीतून “ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे” हे स्पष्टपणे उमटत आहे प्रीतीताई समाधान बांडे फुलझाडे सध्या घरोघरी जाऊन प्रचार मोहीम राबवत आहेत. नागरिकांच्या समस्या अपेक्षा आणि प्रभागाच्या विकासाबाबत थेट संवाद साधत असल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दलच्या विश्वासात मोठी वाढ निर्मान झाली आहे महिलांपासून युवकांपर्यंत व्यापाऱ्यांपासून कामगारांपर्यंत ज्येष्ठ नागरिकांपासून नव्या मतदारापर्यंत प्रीती ताईंना सर्व समाजातून व्यापक आणि जाहीर पाठिंबा मिळत आहे.
प्रभागात झालेल्या संवाद मोहिमेत महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्रिती ताईंना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून
त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

प्रिती समाधान बांडे – फुलझाडे : शिक्षण, अनुभव आणि सामाजिक बांधिलकी
प्रिती बांडे – फुलझाडे या
जळगाव सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून केमिकल इंजिनिअरिंग पदवीधर आहेत.
त्यांनी खाजगी क्षेत्रात व्यवस्थापन, ग्राहक सेवाक्षेत्र आणि समन्वय या क्षेत्रांत उत्तम अनुभव घेतला आहे.
त्यांचा सभ्य व सौम्य स्वभाव, लोकांशी सहज संवाद साधण्याची क्षमता आणि सामाजिक विषयांवरील संवेदनशीलता
यामुळे त्या प्रभागातील महिलांमध्ये आणि युवकांमध्ये विश्वासार्ह नेतृत्व म्हणून उदयाला येत आहेत.
त्यांना खालील विषयांत विशेष रुची आहे:
- महिला सक्षमीकरण
- युवकांसाठी रोजगार व कौशल्य विकास
- पर्यावरण व स्वच्छता उपक्रम
- शैक्षणिक आणि सामाजिक कामे
समाधान बांडे : प्रिती ताईंचे मार्गदर्शक आणि १५ वर्षे अनुभवी करसल्लागार
प्रिती ताईंना त्यांच्या पती समाधान बांडे यांचे दृढ मार्गदर्शन, अनुभव आणि संघटन कौशल्याचा मोठा आधार आहे.
समाधान बांडे हे गेल्या १५ वर्षांपासून करसल्लागार (Tax Consultant)म्हणून कार्यरत असून
प्रभागातील जनसामान्यांच्या करसंबंधित समस्यांमध्ये त्यांनी सतत मदत केली आहे.
- प्रामाणिकपणा,
- संयम,
- सरकारी कार्यालयांशी समन्वयातील पारंगतता,
- आणि लोकांमध्ये असलेला विश्वास
यामुळे ते प्रभागातील एक सेवाभावी व्यक्ती म्हणून ओळखले जातात.
ते स्वतः निवडणूक लढवत नसले तरी
प्रिती बांडे – फुलझाडे यांच्या नियोजन, जनसंपर्क आणि मार्गदर्शनात ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
नागरिकांचा प्रतिसाद
प्रभागात दोघांच्या सामाजिक योगदानामुळे नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
नागरिकांचे मत —
“प्रिती ताईंचे शिक्षण, त्यांचा स्वच्छ दृष्टिकोन आणि समाधान बांडे यांचा अनुभव –
हे दोन्ही मिळून प्रभाग क्र. १ ‘बी’ साठी उत्तम नेतृत्व तयार करतात.”
विकासाचा रोडमॅप – पारदर्शक आणि उत्तरदायी नेतृत्व
प्रिती बांडे – फुलझाडे यांनी प्रभागासाठी खालील मुद्द्यांवर विशेष लक्ष देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे:
- पारदर्शक आणि जबाबदार कामकाज
- स्वच्छता आणि मूलभूत सुविधा सुधारणा
- महिलांसाठी विशेष उपक्रम
- युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण व रोजगार संधी
- नागरिक सहभागातून विकास
“विकास म्हणजे प्रत्येक घर, प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक परिसराची उन्नती.”
