सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणूक अंतिम टप्प्यात, मतदारांना केल्या प्रभाग निहाय वोटर स्लिप (पोल चिट्टी) वाटप….

IMG-20251127-WA0023


सिंदखेडराजा( अनिल दराडे)मा.राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व प्रभागमध्ये मतदारांना पोल चिट्टी वाटप करण्याचे कामं आपले निवडणूक कर्मचारी उत्स्फूर्तपने करत आहेत.

एक नगराध्यक्ष तसेच 20 नगरसेवक पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे. त्यासाठी मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या आदेशानव्ये तसेच मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आशिष बोबडे यांच्या मार्गदर्शनाखालील पुढील प्रभाग निहाय टीम तयार केल्या आहेत.

प्रभाग 1 : श्रीमती मनीषा खार्डे, रणजित मेहेत्रे, दीपक राखोंडे,

प्रभाग 2 : रंजनराव केळकर, भाऊराव ठाकरे, मनोज मेहेत्रे,

प्रभाग 3 : प्रल्हाद सोनुने, राहुल दोडके, राहुल चौधरी,

प्रभाग 4: अस्लम खान, श्रीमती. मुमताज बेगम रहीम, गणेश मापारी,

प्रभाग 5: श्रीमती. छाया पालवे, अशोक नापते, विजय जाधव,

प्रभाग 6: जाकेर शेख, श्रीमती जरीना शाहीन हुसैन, अब्दुल नजीम अब्दुल फहीम,

प्रभाग 7 : रवींद्र चव्हाण, दत्तात्रय भोसले, गंगा हरकळ,

प्रभाग 8: श्रीमती. समीना अजुम जैनुल, मोहम्मद जावेद मो. हयात,किसन मेहेत्रे,

प्रभाग 9: श्रीमती. कुंदा मेहेत्रे, श्रीमती. साधना कुरकुटे, अमोल चौधरी,

प्रभाग 10: राजू मेहेत्रे, नागनाथ किसन दसरे

वरील सर्व प्रभाग निहाय टीम आपल्याला दिलेली जबाबदारी हे चोखपणे पार पाडत आहेत, त्याबद्दल मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि मा.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आशिष बोबडे यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.

You may have missed

error: Content is protected !!