मलगी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाबराव खरात यांची भेट व मार्गदर्शन

IMG-20251128-WA0002

चिखली( एकनाथ माळेकर)महाराष्ट्र शासन, पंचायत राज विभाग, यांचे शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान राबविण्यात येत असून सदर अभियानाच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाबराव खरात साहेब यांनी ग्रामपंचायत मलगी गावाला भेट देऊन गावांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली व अभियान संदर्भात गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. भेटीदरम्यान त्यांनी जि प शाळेमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी संवाद साधला, त्यांच्या हस्ते शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले, त्यानंतर गावातील बांधकाम चालू असलेल्या घरकुलांना भेटी दिल्या, नवीन घरकुल बांधकामांची उद्घाटन व घरकुल बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना गृहप्रवेश साहेबांच्या हस्ते देण्यात आला, त्यानंतर गावातील मल्लिकार्जुन मंदिर परिसर स्मशानभूमी परिसर व इतर विविध ठिकाणांची त्यांनी पाहणी करून गावकऱ्यांना मार्गदर्शन केले या अभियान मध्ये भाग घेऊन अभियानामध्ये पात्र कसे होता येईल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोहन साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष जी पवार साहेब, पंचायत समिती चिखली चे गट विकास अधिकारी समाधानजी वाघ साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी गजानन पोफळे साहेब, महिला व बालकल्याण विभागाचे CDPO श्री वाघ साहेब, तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटना चिखली चे अध्यक्ष रामभाऊ रिंढे तसेच त्यांचे सहकारी आनंद पाटील तसेच तालुकास्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सरपंच सौ सुमित्राबाई साप्ते, ग्रामपंचायत सदस्य श्री संजय पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संजय ज्ञानेश्वर पवार, श्री विनायक साप्ते, श्री दिलीपराव शितोळे, श्री कडूबा भाऊ शेळके, चांगदेव पवार, कैलास घाडगे, विनोद शेळके, उद्धव शेळके, संपत गायकवाड आदी उपस्थित नागरिकांनी या अभियानात तालुकास्तरावर मलगी गाव पात्र होण्यासाठीचा प्रयत्न करण्याची हमी दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कर्मचारी तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी शिवराज साप्ते, नितीन जाधव, अंकुश साप्ते, भागवत पवार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी विनायक वायाळ यांनी केले.

You may have missed

error: Content is protected !!