महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे हमीभाव खरेदी सेवा केंद्र शेलोडी येथे सुरू….
चिखली( बुलढाणा माझा न्युज)शासनाच्या हमी भाव योजनेसुमार महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे संचालित हमी भाव सेवा केंद्र, शेलोडी ( किसान कवच फार्मर प्रोड्युसर कंपनी शेलोडी) येथे काल दिनांक 28 नोव्हेंबर पासून सोयाबीन, उडीद पिकाच्या खरेदीस सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी शेतकऱ्यांचे रुमाल टोपी देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी NEML चे जिल्हा समन्वयक देशमुख साहेब , ग्रेडर श्री संकेत खरात,सरपंच ,शेतकरी उपस्थित होते. सर्व शेतकऱ्यांनी हमी भाव योजनेचा लाभ घेऊन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन किसान कवच फार्मर प्रोड्युसर कंपनी, शेलोडी यांच्याकडून आवाहन करण्यात आले
