सिंदखेड राजा नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, मतदान यंत्र सीलिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पडली पार

IMG-20251128-WA0015


सिंदखेडराजा (अनिल दराडे)मा. राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी ई. व्ही. एम. मशीन सिलिंग करण्याचे काम मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले.

मतदान यंत्र सिलिंग करण्यापूर्वी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या प्रशिक्षणाचा मतदान केंद्र सिलिंग करताना खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला, मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

मा.निवडणूक निरीक्षक श्री. जी पी साबळे यांनी आज नगर परिषद सिंदखेडराजा येथे मतदान यंत्र सिलिंग केंद्राला आज भेट दिली. आजच्या या भेटीदरम्यान श्री. साबळे यांनी सिंदखेड राजा येथील ई. व्ही. एम. सिलिंगच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच महत्वपूर्वक मार्गदर्शन केले.

नगर परिषद निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचली आहे, दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्याच्या साठीची लागणारी तयारीबाबतचा आढावा मा. निवडणूक निरीक्षक श्री. साबळे यांनी घेतला .

सिंदखेडराजा नगर परिषद निवडणूक 2025 साठी मतदारसंघांमध्ये एकूण 21 मतदान केंद्र असून त्यासाठी एकूण 5 सिलिंग टीमने आज काम पूर्ण केले आहे. प्रत्येक टीम मध्ये एक झोनल अधिकारी, दोन ग्राम महसूल अधिकारी, एक महसूल सेवक असे एकूण 4 कर्मचारी -अधिकारी काम करत आहेत.आजच्या ई. व्ही. एम. मशीन सिलिंग प्रक्रियेसाठी उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते, शिल्प निर्देशक उद्धव मांटे यांनी मतदान यंत्र तयार करणाऱ्या पत्रकाचे सनियंत्रण अधिकारी म्हणून काम पार पडले.

मा.निवडणूक निरीक्षक श्री. साबळे यांनी नगर परिषद येथील ई. व्ही. एम. सुरक्षा कक्षाला (strong Room) ला भेट देली तसेच सर्व व्यवस्थाची पाहणी करून कशाप्रकारे ई. व्ही. एम. ला सुरक्षा प्रदान केली जात आहे याची खातरजमा करून घेतली तसेच सिंदखेडराजा नगर परिषद निवडणूक तयारी संबंधी समाधान व्यक्त केले.

आजच्या या ई.व्ही.एम.मशीनचे सिलिंगचे कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने युद्धपातळीवर काम केले आहे आणि ई. व्ही. एम. सिलिंग ची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतली आहे. त्यासाठी मा. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, तहसीलदार सिंदखेडराजा अजित दिवटे , गट विकास अधिकारी सिंदखेड राजा अजितकुमार बांगर , नायब तहसीलदार सिंदखेड राजा डॉ. प्रवीणकुमार वराडे, प्र. नायब तहसीलदार नितीन बढे,कृषी अधिकारी भागवत किंगर, गट शिक्षण अधिकारी स्वप्नील निकम, उप अभियंता गिरीश मालोकार, महिला व बालविकास अधिकारी जीवन राठोड, प्रसार माध्यम नोडल अधिकारी प्रकाश शिंदे, ग्राम महसूल अधिकारी राहुल देशमुख, सुशील शिलवंत,शिवानंद वाकदकर, भास्कर गिरी,स्वप्नील देशमुख, विष्णू थोरात,वासुदेव जायभाये, विलास कटारे,प्रवीण झिने, गोरख पवार, शहर अभियंता हमीद काझी, कार्यालय अधीक्षक प्रभू वाघ, नगर रचना सहाय्यक वृषाली घाणे, कनिष्ठ अभियंता अवधूत कापसे, कनिष्ठ अभियंता रजत मराठे, गजानन मेहेत्रे,राजेश ढेले, मनोज मेहेत्रे,गंगा हरकळ,अमोल चौधरी,विजय जाधव इत्यादी तसेच सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार उपस्थित होते. वरील सर्व निवडणूक कर्मचारी अधिकारी यांनी सिलिंग प्रक्रिया पूर्ण पाडली.

You may have missed

error: Content is protected !!