जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक केंद्र शाळा डोंगरशेवली येथे आज संविधान दिन उत्साहात साजरा
चिखली (गजानन दसरकर) चिखली तालुक्यातील डोंगर शेवली येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक केंद्र शाळेत आज संविधान दिनानिमित्त गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी संविधानाची प्रत पालखीमध्ये ठेवून गावातून दिंडी काढण्यात आली.त्यामध्ये विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या गावांमध्ये ग्रामपंचायत समोर गावातील चौकामध्ये तीन नाटिका वर्ग चौथा, वर्ग पाचवा, वर्ग सहावा यांनी नाटिका सादर केल्या..
यावेळी इयत्ता पाचवी ने सादर केलेल्या संविधान नाटिकेला भीम गर्जना नवयुवक मंडळ डोंगर शेवली यांनी पाचशे रुपयांचे बक्षीस दिले बक्षीस राहुल भाऊ गवई शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष यांच्या हस्ते शाळेची मुख्यमंत्री कु.हिंदवी सतीश दांदडे हिने स्वीकारले.
प्रभात फेरीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र भाऊ सावळे, अमोल पाटील सावळे भाजपा कार्यकर्ते, सुनील पाटील, छगन दांदडे , भुतेकर,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामसेवक ,त्यांचे कर्मचारी, कृषी सहाय्यक, शाळेचे शिक्षक, शिक्षिका ,अंगणवाडी सेविका मदतनीस सर्व सहभागी झाले होते. जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक केंद्र शाळा डोंगर शेवली या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री अनिल लोखंडे सर हे होते प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र भाऊ सावळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शरद भाऊ वानखेडे ,कुलकर्णी सर ,अनिल वानखेडे, राहुल भाऊ गवई आणि गावकरी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमंत सावळे सर यांनी केले. शरद भाऊ वानखेडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गीते सादर केली, काही विद्यार्थ्यांनी भाषणे घेतली होती. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना चार भाषांमध्ये संविधान सादर करण्याबद्दल आवाहन करण्यात आले होते यामध्ये कुमारी हिंदवी सतीश दांदडे हिने चार भाषांमध्ये संविधान सादर केले मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत. अध्यक्षीय भाषणामध्ये श्री लोखंडे सर यांनी संविधान सार्वजनिक रित्या कधीपासून साजरे केले जाऊ लागले याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले .
संविधान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये पाच गटांनी सहभाग घेतला होता. यांना मार्गदर्शन करण्याचे काम विषय शिक्षिका कु.जोहरे मॅडम यांनी केले.यावेळी केंद्राचे केंद्रप्रमुख मा. अनाळकर साहेब उपस्थित होते त्यांनी विजेत्या झालेल्या सुनिता विल्यम गटाचे त्यांनी कौतुक केले .यावेळी चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्तकला स्पर्धा त्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेल्फी विथ संविधान हा सेल्फी पॉइंट सुद्धा तयार करण्यात आला होता यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, गावकरी यांनी या ठिकाणी आपला सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.. कार्यक्रमांमध्ये विशेष म्हणजे आमच्या शाळेमध्ये साडेचार ते पाच वर्षाचा असलेला आमच्या दांदडे सरांचा मुलगा स्वराज याने सुद्धा संविधान म्हणून दाखवले त्याचे सर्वांनी आनंददायी पद्धतीने टाळ्या वाजवून स्वागत केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सोनाक्षी विलास पूर्वे सांस्कृतिक मंत्री हिने केले तर आभार प्रदर्शन कु. श्रुती सावळे हिने मानले अशाप्रकारे संविधान दिन मोठ्या उत्साह आणि आनंदात साजरा करण्यात आला..
