संविधान बांधिलकी महोत्सवा अंतर्गत संविधान जागर कार्यक्रम डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती येथे संपन्न
अमरावती :- 27 नोव्हेंबर 2025 (अमरावती): संविधान दिनानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती येथे एक विशेष संविधान जागर कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती, संविधान जागर अभियान, डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन तसेच विविध समविचारी संस्था व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये संविधान प्रास्ताविका वाचन तसेच संविधानावरील विशेष पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डी. एस. वमने (सचिव विधी सेवा प्राधिकरण अमरावती तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अमरावती) होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून निश्चय साक्षात साधना (संविधान जागर अभियान), तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. वर्षा नितीन देशमुख (प्राचार्य), प्रमोद कोळंमकर (उपाध्यक्ष महा. अनिस. अम.), प्रफुल्ल कुकडे (कार्याध्यक्ष महा. अनिस. अम.), विजय डवरे (प्रधान सचिव महा. अनिस. अम.), नरेंद्र धर्माळे, मो. अफसर भाई, वेदांत कोल्हे, सतीश पठाडे (संविधान जागर अभियान अम.) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांमार्फत संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून घेतले व त्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी, युवकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी संविधानातील लोकशाही मूल्ये अधोरेखित करीत भारतीय संविधानाची प्रास्ताविका सामूहिकरीत्या उच्चारित केली आणि संविधानाबद्दलची बांधिलकी व्यक्त केली.
त्यानंतर निश्चय साक्षात साधना यांनी संविधान बांधिलकी महोत्सवाचे महत्त्व, मूल्ये व भूमिका यावर प्रकाश टाकत सोप्या भाषेत संविधान विचारांचे जनजागरणात्मक मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात डी. एस. वमने यांनी सांगितले:
“भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे जिवंत दर्शन आहे. संविधानातील मूल्यांची अंमलबजावणी ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”
त्यांनी युवकांना संविधान अभ्यास व समज वाढवत न्यायपूर्ण समाज उभारणीतील प्रबोधनाची आवश्यकता अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. संदीप वानखडे (समन्वयक – एल.एल.एम. विभाग), डॉ. नंदकिशोर रामटेके, डॉ. दीपक लोखंडे, डॉ. प्रणय मालवीय, डॉ. राजेश पाटील, डॉ. बी. ए. देशपांडे, डॉ. महेंद्र इंगोले, डॉ. रवींद्र काळे,डॉ. चैतन्य घुगे, डॉ. सुरेश चापोरकर,डॉ. हीना मेहता, डॉ. प्राची कडू, डॉ. अर्चना अवघड, डॉ. राधिका देशमुख, डॉ. अर्चना आखरे, डॉ. कीर्ती मालपाणी, प्रा. हर्षवर्धन रोटे, प्रा. नेहा खत्री, प्रा. मनीषा राठी, प्रफुल्ल घवळे, विजय देशमुख, प्रसाद पांडे, मनोहर सुने, प्रवीण गावंडे, रणजित देशमुख, प्रकाश अवझाड, प्रवीण मिसाळ, सुनंदा चऱ्हाटे, रवी गावंडे, उमेश पवार यांनी महत्वपूर्ण परिश्रम घेतले.
महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने लाभली. संविधान मूल्यांबद्दलची निष्ठा व्यक्त करत सर्वांनी एकमुखाने—
“भारतीय संविधानाचा विजय असो!”
असा सामूहिक जयघोष केला.
कार्यक्रमाचे संयोजन व संचालन प्रा. सपना विधळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संदीप वानखडे यांनी केले.
