नगरपरिषद निवडणूक मतदान बंदोबस्त करीता पोलीस प्रशासन सज्ज. अपोअ-02, उपविपोअ-05, पोनि.-22, पो. अधि. -98, अंमलदार-1266, RCP पथक-05, SRPF-12 सेक्शन, होमगार्ड-1400 असा तगडा बंदोबस्त तैनात.

Screenshot_2025-12-01-10-25-06-18_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज ) मा. राज्य निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार दि.02/12/2025 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील 1. बुलढाणा, 2. चिखली, 3. मेहकर, 4. देऊळगांव राजा, 5. सिंदखेड राजा, 6. खामगांव, 7. लोणार, 8. शेगांव, 9. नांदूरा, 10. मलकापूर, 11. जळगांव जा. या ठिकाणी नगरपरिषदेसाठी मतदान पार पडत असून मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांचे नेतृत्वात बुलढाणा जिल्हा पोलीस दल बंदोबस्तासाठी सज्ज झालेले आहे. सदर नगरपरिषद मतदान बंदोबस्तासाठी अपर पोलीस अधीक्षक-02, उपविभागीय पोलीस अधिकारी-05, पोलीस निरीक्षक-22, पोलीस अधिकारी-98, पोलीस अंमलदार-1266, दंगा काबू पथक (RCP)-05 पथके, राज्य राखीव बल 12 सेक्शन, होमगार्ड-1400 असा मोठा तगडा बंदोबस्त जिल्ह्यात लावण्यात आलेला आहे.

नगरपरिषद निवडणूक-2025 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाणी अतिरीक्त पोलीस बंदोबस्त लावून, गस्तीसाठी वेगवेगळी पथके तैनात करण्यात आलेली आहेत. सदर बंदोबस्ता करीता ड्रोन कॅमेऱ्यांचा उपयोग सुध्दा केला जाणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेल्या समाज कंटकांवर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली आहे. सदर नगरपरिषद निवडणूक ही निःपक्षपातीपणे, भयमुक्त व शांततेत पार पडण्यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मा. श्री. निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनी सर्व नगरपालिका क्षेत्रांमध्ये यापुर्वीच स्वतः भेटी देऊन पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निवडणूकीबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या आहेत.

You may have missed

error: Content is protected !!