प्रामाणिकपणाचे दर्शन आजही जिवंत…सापडलेली पैशाची पर्स आणि मोबाईल पोलीस स्टेशनमध्ये मूळ मालकास केला परत!

oplus_2097152

oplus_2097152

​बुलढाणा:-( बुलढाणा माझा न्युज ) आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे अनेकदा स्वार्थाची भावना वाढीस लागते, तिथे अंकुश श्रीपाद पडघान वय 59 रा. बोरगाव काकडे ता. चिखली येथील नागरिकाने दाखवलेला अनोखा प्रामाणिकपणा कौतुकास्पद ठरला आहे. अंकुश पडघान यांना चिखली वरून बुलढाणा कडे येताना केळवद फाट्या समोर पैशाची पर्स आणि महागडा मोबाईल फोन सापडला. त्यांनी कोणताही विचार न करता थेट स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जमा केला.

आज सकाळी चिखली वरून बुलढाणा कडे येत असताना केळवद फाट्याजवळ त्यांना एक पर्स आणि मोबाईल सापडला त्यामध्ये काही पैसे होते.
​ त्यांच्या मनात विचार आला की ज्या व्यक्तीचे हे असेल, ती खूप काळजीत असेल. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, आणि ते थेट शहर पोलीस स्टेशन येथे आले.
​आणि सापडलेले दोन्ही मौल्यवान वस्तू (पर्स आणि मोबाईल) पोलीस अधिकारी पीएसआय मोरे यांच्याकडे सुपूर्द केले.
​ या पर्समध्ये सुमारे 3000 रोख रक्कम,व मोबाईल सुरक्षितपणे जमा करून मूळ मालकाचा तपास केला. छाया शेषराव नेवरे रा. जांभोरा यांना दिला.अंकुश पडघान यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.

You may have missed

error: Content is protected !!