राऊतवाडी केंद्र उत्साहाच्या वातावरणात ‘श्री गुरुचरित्र’ पारायण सोहळा संपन्न!490 स्वामींच्या सेविकाऱ्यांनी गुरुचरित्र पारायण केले वाचन…दत्तभक्तांसाठी पर्वणी; परिसरात धार्मिकतेची सकारात्मक ऊर्जा
बुलडाणा ( बुलढाणा माझा न्यूज ) साक्षात् दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे वर्णन करणारा ‘श्री गुरुचरित्र’ हा पवित्र ग्रंथ. याचे सप्ताह पारायण नुकतेच बुलडाणा शहरातील राऊतवाडी केंद्र येथे मोठ्या भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात दि 5 डिसेंबर रोजी संपन्न झाले.
मार्गशीर्ष महिन्याच्या अष्टमीच्या दिवशी दि 28 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या या पारायणामध्ये 490 हून अधिक स्वामी सेवेकरी यांनी सहभाग घेतला.

गेले सात दिवस चाललेल्या या सामूहिक पारायण सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर दत्तनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत भाविक मोठ्या श्रद्धेने या ग्रंथाचे वाचन आणि श्रवण करण्यासाठी उपस्थित होते.
गुरुचरित्र पारायणामुळे केवळ व्यक्तिगत उन्नती होत नाही, तर सामूहिक पारायणामुळे समाजात एकोपा आणि सकारात्मकता वाढते. या वर्षीचा उत्साह अभूतपूर्व होता.
या गुरुचरित्र पारायण सोहळ्यासाठी शहरातील सेवेकरी आले आणि शहराबाहेरी आजूबाजूला खेडेगावातील सुद्धा सेवेकरी मोठ्या संख्येने गुरुचरित्र पारायण सोहळ्यात सहभाग घेतला. सात दिवस चाललेल्या या पारायण सोहळ्याची समाप्ती 5 डिसेंबर रोजी झाली या दिवशी महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते मोठ्या संख्येने सेवेकरी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.
