चक्क क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या बुलढाणा तालुका अध्यक्षाला ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली, पाच दिवस केले होते अन्यत्याग उपोषण,पंधरा दिवसात काम चालू करण्याचे दिले होते आश्वासन, सहा महिने होऊनही कामाला सुरुवात होईना,वरवंड येथील गावकरी होणार आता आक्रमक..,….
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ) बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथे दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो या गावात आतापर्यंत कित्येक योजना आल्या पण या योजना कागदावरच राहिल्या आणि गावातील पाणी प्रश्न कायम. गेल्या सहा महिन्या अगोदर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता त्यामुळे त्यांनी वरवंड गावातील झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून अन्य त्याग उपोषण चालू केले हे उपोषण चार दिवस चालले.

उपोषण करीत असताना ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी यांनी पंधरा दिवसाच्या आत काम चालू करू अशे आश्वासनही दिले होते मात्र आज सहा महिने होऊनही वरवंड येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे काम चालू झाले नाही. तालुका अध्यक्ष यांनी चार दिवस अन्यथा उपोषण करूनही ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांनी काम पूर्ण केले नाही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षालाच ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी व खामगाव येथील देशमुख ठेकेदारांनी चक्क केराची टोपलीच दाखवलेली आहे पण आता वरवंड येथील गावकरी संतप्त झालेले आहेत त्यामुळे आता ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयाला चक्क कुलूप लावण्याबाबतच पत्रव्यवहार करणार आहे..
