अंढेरा येथे अज्ञात चोरट्यांचा धाडसी चोरी ऐवज व रोख लंपास नागरिकांमध्ये भितेचे वातावरण .अंढेरा पोलीस स्टेशन चोरावर नियंत्रण ठेवणार का?
चिखली (एकनाथ माळेकर )अंढेरा परिसरात चोरट्यांचे हिमत दिवसेंदिवस वाढत असून पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर हद्दीतच सलग गुन्हे घडत आहेत. नुकत्याच घडलेल्या चोरीच्या प्रकरणाने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोस्टे अंढेरा येथील अप क्र. 355/2025, कलम 305 BNS अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी विष्णू कारभारी काकड (वय 35, रा. अंढेरा) हे बुलढाणा येथे असताना, गावातील राम राठोड यांनी फोन करून त्यांच्या घरात चोरी झाल्याची माहिती दिली. तात्काळ घरी पोहोचले असता घरातील पिशवी, ज्यामध्ये ₹1,30,000 रोख रक्कम, तसेच आईची ३ तोळ्याची चांदीची चैन (₹5,000), ४ तोळ्यांची सोन्याची साखळी (₹1,00,000) असा ऐवज गायब असल्याचे दिसून आले.
याशिवाय, घरातील गॅस सिलेंडर, चिल्लर वापरातील भांडी अशा अंदाजे ₹8,000 किंमतीच्या वस्तूही अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. एकूण अंदाजे ₹2,43,000 किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.
घराच्या पाठीमागील उघड्या दरवाजातून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे प्राथमिक निष्कर्ष तपासात समोर आले आहेत.
घटना 04डिसेंबर 2025 रोजी 21:00 ते 05डिसेंबर2025 रोजी 09:00 या वेळेत घडली असून, तक्रार 05डिसेंबर2025 रोजी 17:10 वा. दाखल करण्यात आली.
देऊळगाव राजा उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अंढेरा पोलीस स्टेशन ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली
तपास अधिकारी दुय्यम ठाणेदार दिनेश घुगे आहेत. घटनास्थळी पोलीस पथकाने पंचनामा करून ई-साक्ष नोंदवण्यात आली आहे.
दरम्यान, गावात व परिसरात वाढत्या चोरीच्या घटना पाहता नागरिकांनी पोलिस प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली असून, “पोलीस स्टेशन काही अंतरावर असताना इतक्या धाडसी चोरीच्या घटना होणे चिंताजनक आहे” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून चोरट्यांवर अंकुश ठेवण्यासाठी रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
