रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान : सिंदखेडराजा येथे HDFC बँकेत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सिंदखेडराजा (अनिल दराडे) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त HDFC Bank, सिंदखेडराजा यांच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी तहसीलदार अजित दिवटे सर, ठाणेदार आशिष इंगळे सर, उपनिरीक्षक बालाजी सानप सर व श्रावण डोंगरे सर यांनी स्वतः रक्तदान करत समाजाला “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” असा मोलाचा संदेश दिला.
कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच नितीनजी शेळके, HDFC शाखा व्यवस्थापक अशपाक खान, तसेच इतर मान्यवर, कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित या उपक्रमात तहसीलदार आणि ठाणेदार यांनी रक्तदानाच्या महत्त्वाबाबत मार्गदर्शन करत अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन केले.
