महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मलकापूर पांग्रा येथे अभिवादन

IMG-20251206-WA0015

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मलकापूर पांग्रा येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बसस्थानकासमोरील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंचशील युवा मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तसेच समता सैनिक दलाकडून सलामी देत बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाला शंकरराव उगलमुगले, यादव टाले, मेजर सर्जेराव मगर, ग्रामपंचायत अधिकारी उद्धव गायकवाड, बीट जमादार निवृत्ती पोपळे, अखिल शेख, मोहम्मदयारखा खुदायारखां, प्रवीण पवार, गोपाल टाले (ग्राप सदस्य), साबेरखां पठाण, तंटामुक्ती अध्यक्ष आरिफ मलिक, माजी सरपंच बंडू उगले, श्रीपाद मखमले, रघु देशपांडे, शरद आटोळे, अमोल देशमुख, सुनील उगले, हान्नान शेख, पत्रकार वसीम शेख, प्रल्हाद देशमुख, गंगाराम उबाळे, ज्ञानेश्वर कळकुंभे, बीएसपी नेते कमलाकर साळवे, गुजरात आबाराव साळवे, गजानन चरवे, बबन राठोड, राजू शेख, नामदेव उगले, सुप्रसिद्ध गायिका आशा चरवे, एड. वसीम फिरोज पठाण, जावेद पठाण, जफर भाई, संतोष काकडे, उजेश वहिले, दिलीप काकडे, रंगनाथ साळवे, अर्जुन मगर, भारत साळवे, संतोष साळवे, पत्रकार अमोल साळवे, त्र्यंबक साळवे, बाळू पैठणे, अभिमान साळवे, आदिनाथ साळवे, साहेबराव साळवे, पवन साळवे, विलास मोरे, कैलास साळवे, भीमराव साळवे, पंढरी मगर, कडूबा काकडे भीमराव मगर, अक्षय मगर, राजू मगर, सुरेश साळवे, मिस्त्री सुनील काकडे, शिवाजी काकडे, पवन तायडे, सुनील मगर आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपप्रज्वलन ग्राप सदस्य राजू साळवे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार भगवान साळवे यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार पवन मगर यांनी केले.

You may have missed

error: Content is protected !!