30 किलोमीटर सायकलिंग स्पर्धेत हर्ष गाढे प्रथम

IMG-20251205-WA0065(1)



बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज )बुलढाणा सायकलिंग क्लबतर्फे आयोजित 30 किलोमीटर सायकलिंग स्पर्धेत भारत विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेला हर्ष गाढे याने प्रथम क्रमांक पटकाविला. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्याहस्ते 5 डिसेंबर रोजी हर्षला पारितोषिक प्रदान करण्यात आले.
स्पर्धची सुरूवात शनिवारी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास जिजामाता क्रीडा संकुल येथून करण्यात आली. यानंतर, संगम चौक, धाड नाका, कोलवड, हातडी, चिखला या मार्गाने निघत परत जिजामाता क्रीडा संकुल येथे समारोप करण्यात आला. यानंतर, बक्षिक समारंभ पार पडला. यामध्ये, पुरुष व महिला गटातील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आले. हर्षल गाढे याने प्रथक क्रमांक पटकाविल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्याहस्ते त्याला पारितोषिक देण्यात आले. बुलढाणा सायकलिंग क्लबतर्फे घेण्यात आलेली ही स्पर्धा उत्साहात पार पडली.

You may have missed

error: Content is protected !!