सुलतानपुरचे ग्रामसेवक गजानन कावरखे यांची उचलबंगडी ग्रामपंचायत सदस्यांनी दिली होती तक्रार
Oplus_16777216
लोणार (यासीन शेख) : अखेर सुलतानपूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गजानन कावरखे यांची उचलबंगडी त्यांचा कार्यकाळ चांगलाच वादग्रस्त ठरला. ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वास न घेता विकास काम करणे अशा विविध कारणाने नेहमी त्याचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला त्यांची अखेर लोणार पंचायत समिती गरविकास अधिकारी उमेश देशमुख यांनी उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी सुलतानपूर ग्रामपंचायतचा अतिरिक्त प्रभार एस.ई.अंभोरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
लोणार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुलतानपुर येथे दीड वर्षापासून गजानन कावरखे हे ग्रामसेवक कार्यरत होते.परंतु त्यांची मनमानी वाढतच असल्याची येथील नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी दि.२० जुन रोजी वरिष्ठांकडे तक्रार दिली होती. ग्रामसेवक कावरखे हे महिला ग्रामपंचायत सदस्यांशी उद्धट वागणुक व कार्यालयात नेहमी गैरहजर असणे गावातील इतर राजकारणात सहभाग घेणे व नागरिकांकडून पैशाची मागणी करणे अशा विविध त्रासदायक कारणांमुळे त्यांची तक्रार ग्रामपंचायत सदस्य केली होती.दि. ३० जुन रोजी ग्रा.प. च्या सभागृहात झालेल्या मासिक सभेतही ग्रा.प.सदस्यांनी ग्रामसेवक बदलीबाबत बहुमताने ठराव घेतला होता.
त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी त्यांची उचलबांगडी केली आहे. झालेल्या बदलीमुळे सुलतानपुर ग्रा.प.सदस्यासह ग्रामस्ताकडून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
