‘आदिल पठाण’ यांना राज्यस्तरीय बहुजन रत्न पुरस्कार जाहीर.!
देऊळगाव राजा (अजर शेख)तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेले ,सामाजिक व सांस्कृतिक ,आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लिखाणाच्या व वक्तृत्वाच्या जोरावर एक वेगळी कामगिरी करत सामाजिक कार्याला प्रथम स्थान देत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले पत्रकार सामाजिक कार्यकर्ते शब्दनायक वृत्तपत्र संपादक adv आदिल पठाण यांना बहुजन रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पत्रकारिता क्षेत्रात असून ही आदिल पठाण यांनी सामाजिक बांधिलकी कधी सोडली नाही.बहुजन महापुरुषांच्या समतावादी विचारांचा जागर करत मी आणि माझे, या पलीकडे जाऊन विविध सामाजिक कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. निस्वार्थ राजकारण, निगर्वी पणा, जमिनीवर पाय ठेवून वावरणे, जनसामान्यांचे सुखदुःखाशी घट्ट नाळ ,समाजातील ज्वलंत प्रश्नावर निर्भीड पणे लिखाण करणे,स्पष्टवक्ते पणा, यामुळे यांचा चाहता वर्ग राजकारणा पलीकडे केव्हाच गेला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत ऋणानुबंध समाज विकास संस्था यांच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय बहुजन रत्न पुरस्कार जाहीर केला आहे. लवकरच सदर पुरस्कारचे वितरण चिखली येथे केले जाणार असल्याचे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
