स्किल एक्यूपंक्चर कॉलेज व हॉस्पिटल बुलढाणा आणि स्किल पॅरामेडिकल कॉलेज बुलढाणा येथे महापरिनिर्वाण दिन साजरा…

IMG-20251208-WA0029

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सचिन सुपे सर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन व स्मृति पूजन केले यावेळी स्किल अबॅकस कंपनीच्या डायरेक्टर डॉक्टर छाया कंकाळ जीवणे, प्राध्यापक संजय सोनोने, प्राध्यापक उमेश साळवे, प्राध्यापिका प्रतिभा जाधव, प्राध्यापिका प्रियंका साळवे, श्री गजानन कंकाळ, प्राध्यापक शुभम सुरडकर, प्राध्या. कोमल लटके,श्री दिगंबर खंडागळे, मेघा मॅडम, भूषण बैरागी, शिल्पा जाधव‌ , लक्ष्मी ढोके आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित राहून महामानवाला आदरांजली अर्पण केली. आपल्या भाषणामध्ये डॉक्टर सचिन सुपे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि बंधुता यांची त्यांनी दिलेली मूल्ये आजही तितकीच महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले, विद्यार्थ्यांनी या दिवशी पुस्तके घेऊन अभ्यास केला असता तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण झाली असती हे मोलाचे विचार डॉक्टर सुपे सर यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. तसेच आपल्या भाषणामध्ये डॉक्टर छाया कंकाळ जीवने यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला तसेच त्यांनी संविधान निर्मितीतील आंबेडकरांचे मोलाचे योगदान, सामाजिक न्यायाची त्यांची भूमिका हे विचार त्यांनी मांडले. प्राध्यापक साळवे सर यांनी आपल्या भाषणातून वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी वागावे, समाजातील दुर्बल व आणि वंचित शोषित घटकांना उभारी देण्याचे बाबासाहेबांचे कार्य आपल्या पिढीसाठी दीपस्तंभ आहे तसेच बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले सर्वात मोठी देणगी म्हणजे भारतीय संविधान समानता, स्वातंत्र्य,बंधुता आणि न्याय यांचा पाया त्यांनी घातला. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत हक्क पोहोचवण्याची ताकद त्यांच्या विचारात होती. प्राध्यापक साळवे सरांनी त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितले की संविधान हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे म्हणजेच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने महामानवाला महापरिनिर्वाणदिनी अभिवादन स्वीकारले जाईल. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या आठवणीवर उजाळा दिला. बाबासाहेबांचे विचार… शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे विचार आजच्या पिढीसाठी आवश्यक आहेत, शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य आहे हेच विचार विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून प्रकर्षाने मांडले. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापिका प्रियंका साळवे यांनी केले.

You may have missed

error: Content is protected !!