एचआयव्ही–एड्स जागरूकतेसाठी नागरे महाविद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम; पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्साह

IMG-20251208-WA0025

सिदखेडराजा( अनिल दराडे)भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ, रूम्हना संचलित तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित नारायणराव नागरे महाविद्यालय, दुसरबीड येथे जागतिक एड्स दिनानिमित्त “एचआयव्ही–एड्स प्रतिबंधनात युवकांची भूमिका” या विषयावर मार्गदर्शनपर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक खंदारे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही-एड्ससंदर्भात सविस्तर माहिती दिली. एड्स प्रतिबंधासाठी आवश्यक काळजी, सुरक्षिततेचे उपाय, सामाजिक समज-गैरसमज याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय नागरे (अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ) उपस्थित होते. युवकांनी आरोग्यविषयक सजगता वाढवून समाजात सकारात्मक बदल घडवावा, असे आवाहन त्यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.
महाविद्यालयातील रेड रिबन क्लब तर्फे आयोजित या उपक्रमांतर्गत पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत प्रथम स्थान : कु. अश्विनी चंद्रहास नागरे,द्वितीय स्थान : प्रज्वल मल्हारी सांगळे,तृतीय स्थान : कु. आरती गजानन चाळशे व कु. प्रेरणा शिवहरी नागरे या विजेत्यांनी स्थान पटकावले
विजेत्यांना प्राचार्य डॉ. नागरे व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन कु. अश्विनी नागरे यांनी केले. प्रस्ताविक प्रा. शंकरलाल मेहेर यांनी तर आभार प्रदर्शन कु. वैष्णवी सानप यांनी मानले.

You may have missed

error: Content is protected !!