संतापजनक……‌ इलेक्ट्रिक बोर्डाचा भोंगळ कारभार, नेहमी वीज पुरवठा खंडित होत असल्याने धोडप येथील नागरिक त्रस्त…..लाईनमनच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप…..

IMG-20251209-WA0003

निलेश कोल्हे

चिखली:- तालुक्यातील धोडप येथील वीजपुरवठा तास न तास खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. रात्री अपरात्री फेज गेल्यानंतर तास न तास फेज टाकल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याला लाईनमन च्या हलगर्जी व निष्काळजीपणा असल्याची नागरिकांकडून बोलल्या जात आहे. मंगळवार दिनांक ०९/१२/२०२५ रोजी सकाळी ४:०० वाजेपासून दोन फेज गेले असता ४:०० वाजेपासून ते १०:०० वाजेपर्यंत सुद्धा फेज टाकण्यात आले नसल्याने धोडप येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सहा तासाहून अधिक तास उलटून सुद्धा फेज टाकण्यात आला नाही असे नेहमी दिवसा रात्री अपरात्री फेज गेल्या नंतर तासं न तास फेज टाकल्या जात नाही असे नेहमी होत असल्याचे धोडप येथील नागरिकाकडून सांगण्यात येत आहे. दिवसा किंवा रात्री अपरात्री फेज किंवा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर त्यांना कळवण्यासाठी फेज टाकण्यासाठी नागरिकांकडून लाईनमन ला फोन करावा लागतो.फोन केल्यावर फोन घेत नसल्याने व तास न तास फेज टाकत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होत आहे.२४ तास वीज पुरवठा करणारे महावितरण इतका निष्काळजीपणा कसे करू शकतात ?
महावितरण कर्मचाऱ्यांवरती वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियंत्रण नाही आहे का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहे.
लाईनमनच्या हलगर्जी व निष्काळजीपणा मुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे गेल्या वर्षभराच्या अगोदर पासून रुजू झालेले लाईनमन हे निष्काळजीपणाची सेवा देत असल्याने विद्युत पुरवठा वारंवार विस्कळीत झाल्यावर तात्काळ दखल घेत नसल्यामुळे गावकऱ्यांचा लाईनमन वर रोष निर्माण झाला असून गावाला तत्पर सेवा देणारा लाईनमन कर्मचारी हवा अशी ओरड गावकरी करत आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन धोडप गावासाठी तत्पर सेवा देणारा लाईनमन कर्मचारी यांची नेमणूक करावी अथवा सध्या कार्यरत असलेल्या लाईनमन यांना काम करण्याची ताकीद द्यावी अशी मागणी धोडप येथील नागरिकाकडून होत आहे.

You may have missed

error: Content is protected !!