पत्नीने पतीला अपमानित केले,अपमान सहन न झाल्याने कुऱ्हाडीने वार पत्नीचा मृत्यू जळगाव जामोद तालुक्यातील उटी बु. येथील घटना…..

Screenshot_2025-12-09-15-08-56-40_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

जळगाव जामोद( बुलढाणा माझा न्युज ) तालुक्यातील उटी बुद्रुक येथे 7 डिसेंबरच्या मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. पत्नी लक्ष्मी पवन धंदाळे (वय 24) हिने पती पवन गजानन धुंडाळे (वय 28) याला वारंवार अपमानास्पद वागणूक दिल्याने रागाच्या भरात पतीने कुऱ्हाडीने तिचा खून केला.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील उटी बुद्रुक येथे घरगुती वादातून अपमानित केल्याने पतीनेच गाढ झोपेत असलेल्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली


लक्ष्मी पतन धुंदाळे (२४, रा. उटी बुद्रुक) असे मृतक महिलेचे नाव आहे. लक्ष्मी ही रात्री घरामध्ये झोपेत असताना तिचा पती पवन गजानन धुंदाळे (२८) याने तिच्या मानेवर कुऱ्हाडीचे वार केले. यामागे ‘तू काही कामाचा नाहीस, बाहेर जा व मरून जा’ असे शब्द बोलून पत्नीने अपमानित केल्याचा राग कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पतीने केलेल्या मारहाणीत लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी ग्राम पोलिस पाटील संदीप सदाशिव गटमने यांनी ८ डिसेंबर रोजी सकाळी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी पवन धुंदाळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक नितीन कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे करीत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!