श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या मोनिका सवडेची आंतरविद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड

IMG-20251209-WA0018

सिंदखेडराजा (अनिल दराडे) वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरत येथे आयोजित पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ स्पर्धांसाठी श्री व्यंकटेश महाविद्यालयाची विद्यार्थिनी मोनिका सवडे हिची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीच्या टेबल टेनिस (महिला) संघामध्ये निवड झाली आहे.

पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ महिला टेबल टेनिस स्पर्धा दिनांक १५ ते १९ डिसेंबर दरम्यान सुरत येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेमध्ये पश्चिम विभागातील महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात या राज्यातील सर्वच विद्यापीठांचे महिलांचे टेबल टेनिस संघ सहभागी होत आहेत.

श्री व्यंकटेश महाविद्यालयाची बी. एस्सी. तृतीयमध्ये शिकणारी विद्यार्थिनी मोनिका लक्ष्मण सवडे हिची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीच्या महिला टेबल टेनिस संघामध्ये निवड झाली आहे. नुकत्याच नांदेड येथे संपन्न झालेल्या राज्य क्रीडा महोत्सवामध्ये खेळलेल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या महिला संघामध्ये मोनिकाचा समावेश होता.

विद्याभारती महाविद्यालय, अमरावती येथे विद्यापीठाद्वारे दिनांक १० ते १२ डिसेंबर पर्यंत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मोनिका या प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहून विद्यापीठ संघासोबत सुरतसाठी रवाना होईल.

मोनिकाच्या या यशाबद्दल तिचे आणि मार्गदर्शक क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. किरण मोगरकर यांचे श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ. छायाराजे जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You may have missed

error: Content is protected !!