ट्रॅक्टरची मोटारसायकलला धडक दोघे जख्मी.टॕक्टर चालकांवरगुन्हा दाखल.

new-project-2025-10-15t091400518_1760499883

चिखली (एकनाथ माळेकर)अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा बु – मेंडगाव रोडवरील दत्त मंदिर पाटीजवळ रमेश किसन टेटवार व देविदास शामराव बलकार हे दोघे जण स्पेल्डर प्लस मोटारसायकल क्र.एम‌एच२८बीआर२६६२ ने दोघे मेरा बु ते मेंडगाव रोडने शेतात जात होते.मेंडगाव वरुन येणारे महिंद्रा कंपनीचे लाल रंगाचे ट्रॕक्टर विना नंबर प्लेट हे समोरुन मोटारसायकलला ठोस मारुन जागेवर न थांबता पळून गेले.
या अपघातात मोटारसायकल वरील रमेश किसन टेटवार यांचा उजवा पाय फॅक्चर आणि मांडीला गंभीर मार लागलेला होता
.तसेच त्यांचे मित्र देविदास शामराव बलकार यांना कंबरेला गंभीर मार लागलेला होता.दोंघानाही पुढील उपचारासाठी चिखली येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
रमेश टेटवार यांचा मुलगा निलेश रमेश टेटवार यांनी दि.१०डिंसेबरला अंढेरा पोलिस स्टेशन मध्ये एम‌एलसी डाॕक्टरचा अहवाल आणुन दिल्याने टॕक्टर चालक शंकर संतोष तोडे रा.मनुबाई यांनी आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी फिर्याद निलेश रमेश टेटवार यांनी दिली असुन सदर घटना ही १४नोव्हेंबरला घडलेली होती.पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार भरत पोफळे करीत आहे.

You may have missed

error: Content is protected !!