खडकपूर्णा धरणातून पाटांद्वारे तातडीने पाणी सोडावे – आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांची मागणी
देऊळगाव राजा ( एकनाथ माळेकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी ) खडकपूर्णा धरणातील पाणी पाटांद्वारे त्वरित सोडावे, अशी ठोस मागणी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी कार्यकारी अभियंता खडकपूर्णा प्रकल्प कार्यालयाकडे केली आहे. अनेक दिवसांपासून पाटांना पाणी न आल्याने हजारो शेतकरी चिंतेत असून पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खेडेकर यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील अनेक शेतकरी पाटांवर अवलंबून आहेत. पेरणी व लागवड पूर्ण झाल्यानंतर पाणी आवश्यक असताना धरणातील पाण्याचा लाभ न मिळाल्यास सोयाबीन, गहू, हरभरा, भाज्यांचे पीक तसेच रब्बी हंगामातील इतर पिकांचा थेट उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक हित धोक्यात येऊ शकते.
मा. आमदार शशिकांत खेडेकर यांनी पुढे मागणी केली की-
कोणत्या पाटाद्वारे पाणी सोडणार,
कोणत्या भागात किती दिवस पाणी उपलब्ध राहील, या संदर्भात अधिकृत वेळापत्रक त्वरित जाहीर करावे आणि त्याची प्रत त्यांना उपलब्ध करून द्यावी.
पाणीउपसा यंत्रणेचा खर्च वाढल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे धरणातील पाटांद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय अधिक विलंब न लावता घेण्यात यावा, अशी मागणी माझी. आमदार शशिकांत खेडेकर यांनी केली आहे.
