अवैध रेती उत्खनन व वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी मंडळ अधिकारी, तलाठी निलंबित,बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचा दणका

IMG-20251211-WA0052

सिंदखेडराज( एकनाथ माळीकर जिल्हा प्रतिनिधी )अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात कारवाई न करता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा भंग केल्याप्रकरणी देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील मंडळ अधिकारी के. बी. ईप्पर आणि दिग्रस येथील तलाठी के. एल. खरात यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निलंबन आदेश जारी केले आहे. त्याच बरोबरीने अवैध वाळूचा साठा केल्याबद्दल दिग्रस येथील उमेश पराड, धनंजय मिसाळ, रविंद्र लाड, भरत पराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You may have missed

error: Content is protected !!