अमरावती विभागीय आयुक्त पथकाची डिग्रस बु येथे अवैध रेती साठ्यावर धाड, बावन्न ब्रास अवैध रेती साठा जप्त.आठ टिप्पर व एक जेसीबी जप्त.
बुलढाणा/देऊळगाव राजा (एकनाथ माळेकर जिल्हा प्रतिनिधी)संपूर्ण जिल्हाभर अवैध रेती माफिया साठी प्रसिद्ध असलेले डिग्रस येथे अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकाने धाड टाकुनी मोठ्या प्रमाणात अवैध रेती साठा तसेच आठ टिप्पर व एक जेसीबी जप्त केल्याने डिग्रस बु येथील भरत संजय प-हाड,रविंद्र भास्कर लाड, धनंजय नारायण मिसाळ,उमेश आत्माराम प-हाड अशा चार अवैध रेती माफियांच्या चांगल्याच नांग्या ठेचल्या.
तालुक्यातील डिग्रस बु येथे खडकपुर्णा नदीचे पात्र असल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणावरुन रेती माफिया दिवस-राञ अवैध रेती उपसा करतात.यापुर्वी महसूल पथकाने अनेकदा या माफियांवर कारवाई चा बडगा उगारला पण पुष्पा स्टाईलने मैं झुकेगा नहीं या उक्तीप्रमाणे अवैध रेतीतुन गब्बर झालेले अवैध रेती माफियांच्या अमरावती विभागीय पथकाने चांगल्याच नांग्या ठेचल्या.या कारवाईत अंदाजे बावन्न ब्रास अवैध रेती साठा,आठ टिप्पर आणि एक जेसीबी जप्त करण्यात आलेले असुन जप्त करण्यात आलेली वाहने अंढेरा पोलिस स्टेशन ला आणण्याची कारवाई अंढेरा पोलिस स्टेशन ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या हजेरीत दुय्यम ठाणदार दिनेश घुगे आणि पोलिस कर्मचारी सुरू होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, देऊळगाव महीचे महसूल मंडळ अधिकारी काशीनाथ भगवान इप्पर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिस स्टेशन ला दि.११डिंसेबर २०२५रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांचे पथकाने ग्राम डिग्रस बु येथे ११ डिंसेबरच्या सकाळी तीन ते चार वाजता मोठ्या प्रमाणात अवैध साठवून ठेवलेली रेती व रेती वाहतुक करण्यासाठी वापरता असलेले टिप्पर वाहनावर कार्यवाही केली असता आरोपी यांच्या ताबयातुन पंचनामा क्र.१ प्रमाणे डिग्रस बु येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे उत्तरेस गट क्र. ४५०मध्ये उमेश आत्माराम प-हाड रा. डिग्रस बु यांचे शेतातील जागेमधील घराशेजारी अंदाजे अवैध्द २५ ते ३० ब्रास रेती साठा किं.अं. 150000/- रुपये दिसला. व तेथे एक जेसीबी किं. अं. 700000/- रुपये उभे असलेली व शेजारी टिप्पर क्र. 1.MH 28 AB 6739 कि.अं. 1200000/- 2.MH 12 RN 3665 किं.अं. 1200000/- 3. विना नंबर प्लेट असलेले किं. अं. 1200000/-असे एकुण तिन टिप्पर व पंचनामा क्र. 02 प्रमाणे धनंजय नारायण मिसाळ रा. डिग्रस बु यांचे स्वतःचे जागेमध्ये अवैध्द 05 ते 10 ब्रास रेती अंदाजे किं.50000/- व 1.एक अशोक लेलॅन्ड कंपनीचे MH 28 BB 8139, किं. अं. 1200000/- 2. एक विना नंबरचे टाटा कंपनीचे टिप्पर किं. अं. 1200000/- असे उभे असलेले मिळून आले. पंचनामा क्र. 03 प्रमाणे रविंद्र भास्कर लाड रा. डिग्रस बु. यांचे घराजवळ अंदाजे 1). 05 ब्रास रेती साठा, किं.अं. 25000/- रुपये 02.) रेती साठाजवळ टिप्पर क्र.1. MH 28 BB 3198, किं.अं. 1200000/- 2. MH 20 EG 9277 किं.अं. 1200000/- 3. पिवळ्या रंगाचे विना नंबरचे उभे असलेले टिप्पर किं. अं. 1200000/- तसेच पंचनामा क्रमांक 04. प्रमाणे भरत संजय प-हाड रा. डिग्रस बु. यांचे जागेत 10 ते 12
ब्रास रेती साठा 60000/- रुपयेचा असा एकुण 1,05,85,000/- रुपयेचा मुददेमाल मिळून आल्याने गुन्हा नोंद करण्यात आलेले आहे.घटनेचा पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार दिनेश घुगे करीत आहे.
