राज्यभर ई-पीक पाहणी (Digital Crop Survey-DCS) रब्बी हंगामासाठी सुरू तहसिलदार अजित दिवटे यांचे शेतकरी यांना आह्वान

IMG-20250910-WA0013


सिंदखेडराजा अनिल दराडे
पुणे – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख कार्यालय, पुणे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आज दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी महत्वाचे निर्देश जारी केले आहेत.

AgriStack संकल्पनेनुसार राज्यात ई-पीक पाहणी (Digital Crop Survey – DCS) मोबाईल अॅपद्वारे रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी आजपासून सुरू करण्यात आली आहे. शासन निर्णय व आधीच्या आदेशांच्या अनुषंगाने शेतकरी व सहाय्यक स्तरावर अॅपद्वारे पीक माहिती नोंदवता येणार आहे.

शेतकरी स्तरावरील नोंदणी कालावधी:
१० डिसेंबर २०२५ ते २४ जानेवारी २०२६

सहाय्यक (फील्ड स्टाफ) स्तरावरील कालावधी:
२५ जानेवारी २०२६ ते १० मार्च २०२६ DCS मोबाईल अॅप रब्बी हंगामासाठी पूर्णतः कार्यान्वित असून Google Play Store वर उपलब्ध आहे. खरीप हंगामासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता रब्बी हंगाम २०२५-२६ साठी नोंदणी प्रक्रियेला अधिकृत प्रारंभ देण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना शेतकरी व सहाय्यकांकडून निर्धारित कालावधीत १००% पीक पाहणी पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, असेही आदेशात नमूद आहे. पाहणीतील दुरुस्त्या मंडळ अधिकाऱ्यांनी मोबाईल अॅपद्वारे ठरलेल्या मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे.तसेच कामकाजाचा नियमित आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी MIS द्वारे घ्यावा व कमी प्रगती असलेल्या तालुक्यांमध्ये मोहिम स्वरूपात पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न गतीने सुरू ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

— डॉ. सुहास दिबसे,
जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे

You may have missed

error: Content is protected !!