एसडीओ प्रा संजय खडसे चंदेरी पडद्यावर पेटवणार क्रांतीचा वनवा
सिंदखेडराजा (एकनाथ माळेकर जिल्हा प्रतिनिधी ) एक साधं, शांत गाव. पण इथल्या जनजीवनाला उर्जित करण्याचं, लोकांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याचं काम जर कोणी प्रामाणिकपणे करत असेल, तर ते आहेत महसूल प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी एसडीओ व प्राध्यापक संजय खडसे. अष्टपैलू व्यक्तिमत प्राध्यापक संजय खडसे आपल्या कलागुणांना जोपासत पेटला वनवाक्रांतीचा या चित्रपटाच्या माध्यमातून ते मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे त्यांचा हा चित्रपट दिनांक बारा ला प्रदर्शित होत असून एक कर्तव्यदक्ष अधिकारी ते कलाकार ही भूमिका ते प्रभावीपणे निभावत आहेत
प्राध्यापक संजय खडसे हे सिंदखेडराजा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून उच्च पदावर असतानाही अहंकाराचा लवलेश नाही, कार्यालयात येणारा प्रत्येक नागरिक त्यांच्यासाठी “शेवटचा माणूस” नाही—तर “सर्वात महत्त्वाचा माणूस” असतो. प्रशासकीय कामातील त्यांचा अनुभव, कार्यतत्परता आणि अचूक निर्णयक्षमता यामुळे ते सतत लोकांच्या न्यायासाठी लढताना दिसतात.पण संजय खडसे हे केवळ अधिकारी किंवा प्राध्यापक नाहीत… ते अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत. प्राध्यापक संजय खडसे हे सुरुवातीला प्राध्यापक म्हणून होते त्यानंतर तहसीलदार ते उपविभागीय अधिकारी म्हणून सध्या काम करत आहेत प्राध्यापक संजय खडसे यांना गाण्याचा प्रचंड छंद आहे त्यांची अनेक गाणे मोठ्या प्रमाणात गाजले आहेत शासकीय योजनेची माहिती आपल्या गाण्यातून त्यांनी लाखो लोकापर्यंत पोहोचवली आहे गाण्याबरोबर ते, बॅडमिंटन लॉन टेनिस खेळतात खेळाडू, सायकलिंगची त्यांना प्रचंड आवड आहे , विविध स्पर्धांमध्ये गाजवलेलं यश—त्यांच्या जीवनात प्रत्येक छंदाला योग्य स्थान आहे. कुटुंब, नोकरी आणि समाजकार्य यांचा सुंदर समतोल ते सहज राखतात.
आणि आता… ते उतरले आहेत चंदेरी पडद्यावर! पेटला वनवा क्रांतीचा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दिनांक 12 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्रा. संजय खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्याची महत्त्वाची भूमिका साकारली आहे.या कथेत एक तरुण गावासाठी, समाजासाठी संघर्ष करतो. त्याच्या डोळ्यांत स्वप्न आहे—परिवर्तनाचं. संघर्षातून उभा राहणारा हा युवक जेव्हा अडचणीत सापडतो, तेव्हा त्याला प्रेरणा देणारा, मार्ग दाखवणारा हात असतो तो प्राध्यापक संजय खडसे यांच्या भूमिकेतून दिसणारा जिल्हाधिकारी.
चित्रपटातील एका प्रभावी प्रसंगात जिल्हाधिकारी त्या युवकाला भारतीय संविधानाची प्रत देतात आणि समाजपरिवर्तन घडवून आणणाऱ्या महापुरुषांचे विचार सांगतात. ही प्रेरणा त्या युवकाला केवळ दिशा देत नाही… तर त्याच्यातून क्रांतीचा वनवा पेटवते.
एक अधिकारी, एक कलाकार, एक समाजप्रेमी
प्रा संजय खडसे यांचा हा प्रवास फक्त एका चित्रपटापुरता मर्यादित नाही; तो आहे एका जबाबदार नागरिकाचा, कार्यक्षम अधिकाऱ्याचा आणि समाजासाठी झटणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा.त्यांचा हा प्रयत्न समाजाला संदेश देणारा आहे प्राध्यापक संजय खडसे यांचे सामाजिक योगदान ही मोठ्या प्रमाणात आहे प्रशासकीय अधिकारी ते चित्रपटातील कलाकार या प्रवासा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
