भरोसा येथे शेतकरी नेते शरद जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली महादेव मंदिरात महिलांसह ग्रामस्थांकडून प्रतिमापूजन

IMG-20251212-WA0051

निलेश कोल्हे

चिखली :-तालुक्यातील भरोसा येथे शेतकरी संघटनेचे संस्थापक, शेतकऱ्यांचे हक्कासाठी आयुष्यभर लढणारे ज्येष्ठ शेतकरी नेते स्व. शरद जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भरोसा येथील महादेव मंदिराच्या सभामंडपात ग्रामस्थांनी श्रद्धेने प्रतिमापूजन करून आदरांजली अर्पण केली.

भरोसा गावावर शरद जोशींच्या विचारांचा प्रभाव सुरुवातीपासूनच खोलवर आहे. त्यांच्या कार्याचा वारसा जपण्याची परंपरा म्हणून गावात दरवर्षी त्यांची जयंती व पुण्यतिथी उत्साहाने आणि नित्यनेमाने साजरी केली जाते.

१२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता गावकरी महादेव मंदिरात मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. कार्यक्रमाची सुरुवात महिलांनी शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनीही पुढे येत प्रतिमापूजन करून पुष्प अर्पण केले.

या स्मृतिपूजन कार्यक्रमात
एकनाथ पाटील, विक्रम आज्या, राजू शेटे, एकनाथ दगडू थुट्टे, एकनाथ कडुबा, सुखदेव सादुबा, विठेबा गव्हते, सुभाष चेके, विठ्ठल पर्वता, नामदेव थुट्टे, नामदेव सदाशिव थुट्टे, नरहरी थुट्टे, एकनाथ शेटे, राजू पाटील, मधुकर पाटील, गजानन थुट्टे, पांडुरंग महादू, संजय थुट्टे, सुखदेव तरमळे, संदीप थुट्टे, वैभव शेटे, अंकुश सुरेश थुट्टे, शंकर पैठणे, दगडू वाघमारे तसेच सौ. सुमनबाई थुट्टे यांनी प्रतिमापूजन करून आपल्या आदरभावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाला गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद जोशी यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प या वेळी व्यक्त करण्यात आला.

You may have missed

error: Content is protected !!