डोंगर खंडाळ्यात जिल्हा परिषद शाळेच्या समोरच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या युवकाविरुद्ध बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…..
Oplus_16777216
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज )बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेपासून शंभर मीटर परिसरात पानटपरीमध्ये तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या युवकाविरुद्ध बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून तंबाखू, बिडी असे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. बुलढाणा ग्रामीण पोलिस पेट्रोलिंग करत असताना पथकाने शाळेजवळ जावून तपासणी केली असता. गोतीराम जाधव, हा शाळेच्या शंभर मिटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना आढळून आला. फिर्यादीवरुन जाधव याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त अशे की डोंगर खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर महादेव मोबाईल शॉपी पान टपरी वर बिडी बिडल व तंबाखू पाकिटे जवळ बाळगून त्याची विक्री करीत असल्याची माहिती ठाणेदार बुलढाणा ग्रामीण यांना मिळाली होती बुलढाणा ग्रामीण चे कर्मचारी डोंगर खंडाळा येथील बसस्टॉप वर थांबले असता जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मध्ये 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास मनाई असताना सुद्धा महादेव मोबाईल शॉपी व पान टपरीवर शाळेसमोर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना आढळून आले त्यावेळेस पान टपरीची झडती घेतली असता तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोहेका महादेव इंगळे बन 2077 यांनी आरोपी गणेश गोटीराम जाधव यांच्याकडून 590 रुपयाचा मुद्देमाल मिळाला आहे सदर आरोपी यास बी एन एस 35(3) मा न्यायालयामध्ये हजर राहण्याबाबत सूचना पत्र देऊन मोक्यावर सोडण्यात आले तरी आरोपी गणेश मोतीराम जाधव वय 24 वर्षे राहणार डोंगर खंडाळा तालुका जिल्हा बुलढाणा यांचे विरुद्ध कलम 6(a)24 सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादक कायदा सन 2023 अन्वेये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोहेका महादेव इंगळे 2077, पोका राजू आघाव बन 2479 दत्तात्रय भाकडे बन 2149 यांनी ही कारवाई केलेली आहे…
