जलजन्य आजारांबाबत प्रा.आ. केन्द्र.हतेडी बु.येथील आशा सेविका करणार जनजागृती…..

IMG-20250702-WA0021

बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज )हतेडी बु.प्राथमिक आरोग्य केंद्र दिनांक २६/०६/२०२५ जून आशा सेवकांची मासिक सभा पार पाडण्यात आली यावेळी हिवताप जनजागरन मोहीम राबवण्यात आली असून हिवताप व डेंग्यू पावसाळ्यात होणाऱ्या जलजन्य आजारांविषयी जनजागृती व उपाय योजना मोहीम राबविण्याबाबत आशा सेविकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

पावसाळ्याला सुरुवात झाली आहे पावसाळ्यात अनेक आजार डोके वर काढतात पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने विविध प्रकारचे जलजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते तसेच डबक्यात पाणी साचल्याने त्यामध्ये डासाची उत्पत्ती होऊन हिवताप, डेंग्यू,मलेरिया आशा आजारांची सुरवात होते या आजारांबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपयोजना करण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारीश्री .चव्हाण साहेब, जिल्हा सहाय्यक हिवताप अधिकारी श्री . पांडे साहेब व श्री होगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हतेडी बु.प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण जवजाळ साहेब व डॉ.प्रशांत बदर साहेब यांनी २६ जून रोजी अशा सेविका व गटपर्वतकांना मासिक सभेच्या वेळी हस्त पत्रिका व डायरी भाग 1 भाग 2 त्यामध्ये आशा सेविकांची कर्तव्य आणि लसीकरण संदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी जनजागर मोहीम राबवण्यात आली . तसेच कंटेनर सर्वेक्षण विषयी माहिती देऊन मलेरिया डेंग्यू आणि पावसाळ्यात होणाऱ्या जलजन्य आजारांविषयी सोबतच अतिसाराविषयी जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे . यावेळी आरोग्य विभागाचे LSO श्रीमती उषा साखरे, व आरोग्य सहाय्यक श्री.पी.डी.जाधव श्री. अरुण जाधव , आणि LHV लहासे सिस्टर व आरोग्य सेवक श्री.नितीन आमले व श्री.साळोख व गटप्रवर्तक आणि आशा सेविका उपस्थित होत्या.

You may have missed

error: Content is protected !!