शेतीच्या वादातून भावाने भावाला खुपसले…..
बुलढाणा (एकनाथ माळेकर जिल्हा प्रतिनिधी) पोलीस स्टेशन रायपूर हद्दीत दिनांक 10/12/2025 रोजी सकाळी 11/00 वाजताचे सुमारास साकेगाव तालुका चिखली येथील भारत फकिरा इंगळे व शरद फकिरा इंगळे या दोन्ही सख्या भावांमध्ये शेतीच्या कारणावरून भांडण झाले त्या भांडणमध्ये शरद फकिरा इंगळे यांनी त्यांचा मोठा भाऊ भारत फकिरा इंगळे यांना पाठीवर व पोटावर चाकूने वार करून जिवाने मारण्याचा प्रयत्न केल्यावरून जखमी यांची सून नामे वैशाली गोपाळ इंगळे यांचे तक्रारी वरून पोलीस स्टेशन रायपूर येथे अपराध क्र 235/25 कलम 109,115(2),118(1),352 प्रमाणे गुन्हा नोंद झाल्याने पोलीस स्टेशन रायपूर येथील ठाणेदार श्री निलेश सोळंके, पोहेकॉ शितोळे पो. कॉ राहुल जाधव, शिंदे, कळमकर, काझी यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन बुलढाणा येथील फॉरन्सिक व्हॅन सुद्धा बोलाविण्यात आली सदर घटनास्थळला मा उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा यांनी भेट दिली. सदर गुन्हाचा तपास मा. पोलीस अधीक्षक सा बुलढाणा. मा अपर पोलीस अधीक्षक सा खामगाव. मा उपविभागीय पोलीस अधिकारी सा बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश सोळंके साहेब, पो कॉ लक्ष्मण शिंदे हे करीत आहेत.
