अनंता नामदेव कुरंगळ यांची युवा सेना शहरप्रमुखपदी नियुक्ती

IMG-20251213-WA0048

सिंदखेडराजा (अनिल दराडे )शिवसेना (शिंदे गट) युवा सेनेच्या सिंदखेडराजा शहरप्रमुखपदी श्री. अनंता नामदेव कुरंगळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटनेत त्यांनी मागील अनेक वर्षांपासून केलेल्या उल्लेखनीय व निष्ठावान कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

पक्षाचे मुख्य नेते मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. अध्षी भाऊ प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या सूचनेवरून ही नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र माजी आमदार मा. शशिकांत खेडेकर साहेब यांच्या हस्ते अनंता कुरंगळ यांना प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट) व युवा सेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये आतिश भाऊ तायडे, शिवा मामा ठाकरे, वैभव सर देशमुख, बालाजी भाऊ मेहेत्रे, श्रीनिवास खेडेकर, राजूभाऊ आढाव तसेच गौतम भाऊ खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी नवनियुक्त शहरप्रमुख अनंता कुरंगळ यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नवनियुक्त पदाधिकारी श्री. अनंता कुरंगळ यांच्याकडून समाजातील सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे

You may have missed

error: Content is protected !!