देऊळगाव राजा- चिखली नॅशनल (753/A )हायवेवर दररोज घडताहेत अपघात. डिव्हायडर व रस्त्याशेजारील झाडेच ठरताहेत अपघाताचे कारण……
चिखली (एकनाथ माळेकर जिल्हा प्रतिनिधी)चिखली तालुक्यातील नॅशनल हायवे क्रमांक 753A वर केलेल्या निष्काळजी, अर्धवट आणि नियमबाह्य कामामुळे या परिसरात भीषण अपघातांची मालिकाच सुरू असून नागरिकांनी अखेर संताप व्यक्त करत नॅशनल हायवे विभागाकडे लिखित निवेदनाद्वारे तीव्र निषेध नोंदवला आहे. चिखली शहराजवळील रस्त्यावर चिखली ते मेरा फाट्यापर्यंत गेल्या काही महिन्यांत वारंवार अपघात होत असलेल्या अपघातांमुळे मृत्यू व गंभीर जखमींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या हायवेवरील कामामुळे जनजीवन धोक्यात आल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.
दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी तहसीलदार चिखली यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अभियंता नॅशनल हायवे (७५३/A) यांना पाठवलेल्या निवेदन नमूद करण्यात आले आहे की आपल्या अधिकार क्षेत्रात असलेला दे. राजा ते चिखली नॅशनल हायवे सध्या मृत्यूचा सापळा बनला असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या जमिनी आपण विनामूल्य घेऊन या नॅशनल हायवे ची उभारणी केली उभारणी करत असताना आता अपघाताचे प्रमाण कमी होईल आपल्याला सुरक्षित प्रवास करता येईल असं गोड स्वप्न सर्वसामान्यांनी पाहिलं होतं परंतु ते स्वप्न सध्यातरी हवेतच विरलेले दिसत असून याच देऊळगाव राजा चिखली नॅशनल 753/A हायवेवर दररोज कुठे ना कुठे अपघात घडत आहेत.
अपघातामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडत आहे अलीकडेच याच रोडवर काटे पांगरी येथील नामांकित डॉक्टर काटे यांचाअपघात होऊन मृत्यू झाला त्याच्या एक दिवस अगोदरच वळती येथील अंकुश भनगे नावाच्या तरुणांचा रामनगर फाट्यावर अपघात झाला असे एक ना अनेक अपघात वारंवार या रोडवर होत असतात त्याचे मुख्य कारण म्हणजे या रोडच्या आजूबाजूला वाढलेले मोठमोठे काटेरी झाड अक्षरशा रोडवर आलेले आहेत.शिवाय जे डिव्हायडर वर आपण झाडे लावले त्या झाडांनी एवढे रुद्ररूप धारण केले आहे की ती फुलांची झाड शिवाय त्यामध्ये असंख्य काटेरी बाभळीचे झाड दोन्ही बाजूंनी पाच पाच सहा सहा फूट रोड या झाडांनी व्यापला असून याच झाडांच्या फांद्यामुळे टू व्हीलर वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अचानक त्या फांद्यांचा मार लागतो व त्यांचा तोल जाऊन अपघात होतो.
ज्या ठिकाणी वळण आहे अशा ठिकाणी आपल्याच प्रशासनाने दिशादर्शक फलक लावलेले आहे परंतु ते दिशादर्शक फलक काटेरी झुडपान्नी पूर्णपणे वेढले असून ते पाहूनही सापडत नाही शिवाय समोरून येणाऱ्या वाहनांचा किंवा समोर चालत असलेल्या वाहनांचा अंदाज घेता येत नाही साहेब आपले अधिकारी वारंवार या रोडवरून ये जा करत असतात मग त्यांच्याही परिस्थिती का लक्षात येत नाही, आपली भूमिका ही निवळ सांगकाम्यासारखी झाली असून अजून आपण आपल्या या निष्कर्षीपणामुळे किती लोकांचा जीव घेणार आहात ते तरी एकदा स्पष्ट करा किंबहुना सदर रोडवरची काटेरी झुडपे तात्काळ काढून रोड मोकळा करावा मात्र आपण आमच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून येणाऱ्या आठ दिवसाचे आत या जीवघेण्या झाडाझुडपाची वाट लावली नाही तर आम्ही आमच्या सहकाऱ्यांसह आज दि. 11/12/2025 पासुन आठ दिवसानंतर मुरादपूर फाट्याजवळच बेमुदत रास्ता रोको करू याची नोंद घ्यावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर माजी सरपंच विनायक सरनाईक क्रांतिकारी शेतकरी संघटना नेते, पत्रकार समाधान गाडेकर यांच्या स्वाक्षरी आहेत.
