अध्यात्मिक क्षेत्राला मोठा धक्का!परमहंस तेजस्वी महाराज अनंतात विलीनवयाच्या ९० व्या वर्षी घेतला महासमाधीचा मार्ग; लाखो भक्तांवर शोककळा.

IMG-20251214-WA0000

प्रतिनिधी :- निलेश कोल्हे

मेहकर:- तालुक्यातच नव्हेतर बुलढाणा जिल्ह्यातील आध्यात्मिक विश्वाला आणि संतपरंपरेला धक्का देणारी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. परमपूज्य परमहंस तेजस्वी महाराज यांचे आज दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 07: 42 मिनिटांनी परमपूज्य तेजस्वी महाराज ९० व्या वर्षी अनंतात विलीन झाले असून अतिशय दुःखद अंतकरणाने त्यांना उद्या दिनांक 14 डिसेंबर 2025 वार रविवार रोजी दुपारी 01:00वाजता तेजस्वी महाराज संस्थानच्या परिसरात त्यांना लाखो भक्तांच्या उपस्थिती महासमाधी देण्यात येणार आहे . अशी अधिकृत माहिती संस्थांच्या वतीने देण्यात आली आहे.
‘तेजस्वी महाराज’ म्हणून ओळखले जाणारे परमहंस हे केवळ एक संत नव्हते, तर ते चैतन्य आणि ज्ञानाचे प्रज्ज्वलित दीप होते. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ज्याचे दुःख त्यांच्या लाखो अनुयायांमध्ये तीव्रतेने पसरले आहे.
महाराजांचे पार्थिव शरीर आतापासून उद्या दुपारी 12:30वाजे पर्यंत मंदिरात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यांनंतर त्यांच्या महासमाधीची तयारी होणार
या क्षणी, त्यांचे भक्तजन आणि अनुयायी मोठ्या संख्येने वरोडी येथे शोकाकुल मनाने जमू लागले आहेत. दैवी तेजाचा हा अस्त झाला असला तरी, महाराजांचे तेजस्वी आशिर्वाद पिढ्यानपिढ्या मार्गदर्शन करत राहतील.

You may have missed

error: Content is protected !!