दीपाक्षर दिवाळी अंकाची निर्मिती उत्कृष्ठ असून वाचकांच्या आवडी निवडी जपणारी आहे: ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बी. ए. खरात

Screenshot_2025-12-14-20-18-03-13_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

चिखली( एकनाथ माळेकर जिल्हा प्रतिनिधी) मेहकर येथील जन स्वप्नपूर्ती मीडियाचे मुख्य संपादक व युवा पत्रकार विनोद बोरे तसेच सर व्यवस्थापिका सौ. अर्चनाताई बोरे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील त्याच बरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रस्थापित व नवोदित साहित्यिकांकडून वेगवेगळ्या विषयावर आधारित कविता कथा वैचारिक लेख ललित लेख व्यक्तिरेखा ऐतिहासिक लेख पुस्तक परीक्षण इत्यादी विषयावर साहित्य बोलावून घेऊन समतोल साधून वाचकांना दिवाळीच्या फराळाबरोबरच साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी उत्कृष्ट दीपाक्षर दिवाळी अंकाची निर्मिती काही वर्षांपासून करीत आहेत तशीच यावर्षी सुद्धा दीपाक्षर दिवाळी अंक २०२५ ची उत्कृष्ट निर्मिती करून वाचकांच्या आवडी- निवडीची जोपासना करून वाचकांना वैचारिक आस्वाद देण्याचा आटोकात प्रयत्न केला आहे असे विचार चिखली येथील जेष्ठ साहित्यिक, कादंबरीकार प्रा.बी.ए. खरात यांनी दिनांक १० डिसेंबर रोजी चिखली येथील स्तंभलेखन व विचारवंत माधवराव जपे यांच्या निवासस्थानी दीपाक्षर दिवाळी अंक २०२५ प्रकाशन व चिखली येथील साहित्यिकांना दिवाळी अंकाचे वितरण या संयुक्त छोट्याशा कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून केले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्तंभलेखन व विचारवंत माधवराव जपे होते. सर्वप्रथम संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर चिखली येथील काँग्रेस पक्षाचे नेते व विचारवंत, साहित्यिक डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी स्वतः लिहिलेला आरोग्यदायी लेख चालणे व्यायामाचा राजा सदर दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे पण दुर्दैवाने डॉ. सत्येंद्र भुसारी यांचे मागील महिन्यात मुंबई येथे रेल्वे अपघातात दुःखद निधन झाले आहे तसेच माजी मंत्री, जिल्ह्याचे जलक्रांतीचे जनक स्व. भारत बोंद्रे, भारतीय जनता पक्षाचे युवा नेते स्व. पंजाबराव धनवे यांच्या नुकत्याच झालेल्या दुःखत निधनाबद्दल कार्यक्रमात भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
आपल्या प्रस्थापित भाषणातून दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक व साहित्यिक किसन पिसे यांनी जिल्ह्यातील साहित्यिकांनी आमच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविले त्याबद्दल त्याचे आभार व्यक्त करून प्रा. डी.आर सावळे, सुप्रसिद्ध मराठी गझलकार नजीम खान, प्रा.बी.ए. खरात, प्रा.मधुकर वडोदे, प्रा. दिगंबर कानडे माधवराव जपे, प्रशांत पाटील इत्यादी मान्यवर साहित्यिकांना दीपाक्षर दिवाळी अंक २०२५ चे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सुंदर आयोजन प्रितेश जपे यांनी केले तर नजीम खान यांनी दीपाक्षर दिवाळी अंक २०२५ चे मुख्य संपादक युवा पत्रकार विनोद बोरे, सरव्यवस्थापिका सौ. अर्चनाताई बोरे, सहसंपादक प्रा. वसंतराव मापारी तसेच सर्व मार्गदर्शक मान्यवर मंडळी या सर्वांचे आभार मानले.

You may have missed

error: Content is protected !!