शेतकऱ्यांसाठी दिलासादायक योजना : आत्मा व पोखरा अंतर्गत गटांना विविध लाभ व मार्गदर्शन…
सिंदखेडराजा (अनिल दराडे ) कृषी उत्पादनात वाढ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा या हेतूने कृषी विभागामार्फत आत्मा (ATMA – Agricultural Technology Management Agency) तसेच पोखरा (PoCRA – Project on Climate Resilient Agriculture)अंतर्गत विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जाण्यासाठी या योजनेअंतर्गत थेट लाभ शेतकरी गट, महिला बचत गट, युवक गट व प्रगतिशील शेतकऱ्यांना मिळण्यासाठी श्री नीलेश ठाकरे सहाय्यक कृषी अधिकारी , श्री सचिन काळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी मार्गदर्शन केले.
आत्मा अंतर्गत शेतकरी गटांसाठी योजना
आत्मा योजनेंतर्गत शेतकरी गटांची क्षमता वाढविण्यावर भर देण्यात यावा यामध्ये प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, अभ्यास दौरे, शेतशाळा, तांत्रिक मार्गदर्शन आदी उपक्रमांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, सुधारित बियाणे, खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, मूल्यवर्धन व मार्केटिंग ,शेतकरी गटांना सामूहिक शेती, इनपुट खरेदी, उत्पादन विक्री व प्रक्रिया उद्योगाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन व आव्हान श्री सचिन काळे तालुका तंत्रज्ञ व्यवस्थापक सि.राजा यांनी केले.
पोखरा अंतर्गत हवामान अनुकूल शेती
पोखरा प्रकल्पामार्फत हवामान बदलाशी सुसंगत शेती विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त व अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. याअंतर्गत जलसंधारण कामे, शेततळी, ठिबक व तुषार सिंचन, मृद व जल व्यवस्थापन, पिक विविधीकरण, फळबाग लागवड आदी बाबींना अनुदान बाबत माहिती श्री निलेश ठाकरे सहाय्यक कृषी अधिकारी यांनी दिली
. शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
आत्मा व पोखरा योजनांमुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाबाबत जागरूकता वाढली असून गटशेतीकडे कल वाढत आहे. अनेक शेतकरी गटांनी उत्पादन खर्च कमी करून नफा वाढविल्याचे अनुभव सांगितले आहेत.
कृषी विभागाच्या या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शेती अधिक सक्षम, टिकाऊ आणि नफ्याची ठरत असून भविष्यात अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षणा साठी गावांतील शेतकरी बचत गट व असंख्य शेतकरी उपस्थित होते
