आधी काम दाखवा, मग देयक अदा करा.गैरप्रकार रोखण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी काढले आदेश

IMG-20251215-WA0008

सिंदखेडराजा( अनिल दराडे) ग्रामपंचायत स्तरावर वित्त आयोग व इतर योजना मधून अनेक काम होत असतात. गेल्या काही दिवसापासून काही ग्रामपंचायतीमधून विकास कामांमध्ये गैरप्रकार होण्याच्या तक्रारी पंचायत समितीला प्राप्त झाल्या होत्या. काही ग्रामपंचायतीमध्ये अनियमितता झाल्याच्याही नागरिकांच्यातक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अशा गैरप्रकार यांना आळा बसवण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी व स्थळपाहणी झाल्याशिवाय देयक अदा न करण्याचा आदेश ग्रामपंचायतीना काढला आहे. कामाची प्रत्यक्ष पाहणी पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी व अभियंता यांच्यामार्फत केली जाणार आहे. काम नियमाप्रमाणेच झाले आहे तसेच ज्या कामासाठी निधी पुरवला आहे तिथेच तो खर्च होत आहे याची खात्री हे अधिकारी करतील, त्यांच्या अहवालानंतरच त्या कामाचे वेतन अदा करता येईल. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र जि प पं स अधिनियम मधील तरतुदींनुसार हा आदेश निर्गमित केला आहे.
ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या विकास कामांमधील गैरप्रकारांवर आळा बसवण्यासाठी घेतलेल्या निर्णयाची नागरिकांनी स्वागत केले आहे.

You may have missed

error: Content is protected !!