अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीत धडाकेबाज कारवाई कारवाईत देशी दारूची 28 बॉक्स व इतर असा4,08,640/ रुपयाचा मुद्देमाल जप्त, दोघावर गुन्हा दाखल…..
चिखली (बुलढाणा माझा न्युज ) अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीत मध्ये अमडापूर वरून मंगरूळ नवघरे चौकाकडे येत असताना चौफुली वरती नाकाबंदी केली असता दोन जणांना दारू वाहतूक करीत असताना पकडले यामध्ये सुरेश जगन्नाथ सवडतकर वय (वर्ष 42 ) राहणार अमडापूर व Ishq विजय भालेराव वय (वर्ष 25) राहणार अमडापूर यांच्या ताब्यातून चार चाकी वाहनासह देशी दारूचे 28 बॉक्स किंमत 1,08,640 रुपये व मारुती सुझुकी कंपनीची एस प्रेसो पांढऱ्या रंगाची कार किंमत 3,00,000 रुपये असा एकूण 4,08,640 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. पकडलेल्या दोन्ही आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन अमडापुर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहे. सदरची कारवाई मा. श्री. निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेश तर श्री. श्रेणिक लोढा अपर पोलीस अधीक्षक खामगांव, श्री. अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. सुनिल अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे नेतृत्वात पोउपनि. अविनाश जायभाये, पोना. अनंता फरताळे, सुनिल मिसाळ, पोकों. अमोल शेजोळ, गणेश वाघ, सतीश नाटेकर, मपोकॉ. पूजा जाधव नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांचे पथकाने केली आहे
