सिंदखेड राजा मध्ये ग्रामपंचायतहारित क्रांती!घडिवणार गटविकास अधिकारी बागर
सिंदखेड राजा( अनिल दराडे )समृद्ध पंचायत राज अंतर्गत २५ ग्रामपंचायतच्या वेबसाईट तयार केल्या गेल्या आहेत, ज्यामुळे ग्रामपंचायतची मूलभूत माहिती, उपक्रम व चांगल्या गोष्टी ऑनलाइन प्रसिद्ध केल्या जातील. यामुळे ग्रामपंचायतमध्ये पारदर्शिता आणि विकासाची नवी दिशा मिळेल!पंचायत समितीकडून तालुक्यात सहा ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय कार्यान्वित करण्यात आले आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागेल आणि नवीन यशाच्या वाटा मिळतील. गटविकास अधिकारी बांगर यांचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मैलाचा दगड ठरेल!
आडगाव राजा, अंचली, झोटिंगा, दरेगाव, पांगरी उगले व वरुडी या सहा ग्रामपंचायत मधील समाजमंदिरामध्ये ही वाचनालये कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
या उपक्रमामुळे सिंदखेड राजा तालुक्यात विकासाची नवी क्रांती सुरू झाली आहे!
