खडकपूर्ण नदीपात्रातून रेती उत्खनन करणारा जेसीबी जप्त
सिंदखेडराजा (अनिल दराडे)खडकपूर्ण नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन करणारा जेसीबी जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई महसूल व पोलीस विभागाने संयुक्तपणे केली आहे.हिवरखेड येथे रात्री २ वाजता धडक कारवाई करून वाळू वाहून जाणारी जेसीबी जप्त करण्यात आली. या कारवाईत रेती तस्करी करणाऱ्या तस्करांवर दहशत पसरली.तहसीलदार अजित दिवटे यांनी विशेष पथक गठित करून अवैध रेती उत्खननावर कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. नायब तहसीलदार प्रवीणकुमार वराडे, महसूल अधिकारी गोरख पवार, विष्णू थोरात आणि जेसीबी चालक व मालकाविरुद्ध किंगाव राजा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर यापुढेही सातार्त्यान कारवाई सुरू राहणार असल्याचे तहसीलदार दिवटे यांनी सांगितले.
