जलंब ग्रामपंचायतीकडून खोटी ग्रामसभा दाखवून बनावट सह्या केल्याबाबत चौकशीची शेगाव पंचायत समितीला तक्रार दाखल…..

Screenshot_2025-12-19-16-59-50-47_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

जलंब:-(बुलढाणा माझा न्युज ) शेगाव पंचायत समिती येथे जलंब येथील श्री. गोपाल शालीग्राम मोहें ग्रा. पंचायत सदस्य जलंब, शिवसेना तालुका संघटक (उ.बा.ठा.) यांनी पंचायत समिती येथे लेखी स्वरुपात तक्रार केलेली आहे या तक्रारीत अशी म्हटले आहे की जलंब येथील ग्रामपंचायतीने खोटी ग्रामसभा दाखवून ग्रामपंचायत सदस्य श्री. गोपाल शालीग्राम मोहँ यांची बनावट खोटी सही केलेली आहे, हे बाब ऑनलाईन रेकॉर्ड तपासणीदरम्यान स्पष्टपणे निदर्शनास आलेली आहे.

सदर प्रकरणी चौकशी केली असता श्री. गोपाल शालीग्राम मोहें यांना ग्रामपंचायतीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.तसेच दिनांक ०७/१२/२०२५ रोजी जलंब ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेतल्याचा ठराव ऑनलाईन रेकॉर्डवर दाखविण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात सदर अहवाल हा केवळ टेबलवर तयार करण्यात आला असून त्यावर इतर लोकांच्या सह्या करण्यात आल्या आहेत.
असे असतानाही ग्रामपंचायतीने मनमानी पद्धतीने खोटी ग्रामसभा दाखवून जनतेची तसेच शासनाची फसवणूक केलेली आहे. हा प्रकार गंभीर असून लोकशाहीची प्रक्रिया व ग्रामपंचायत कायद्याचा भंग करणारी आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी सरपंच/सचिव व इतर संबंधितांवर तात्काळ व कडक कायदेशीर कारवाई करावी. अशे या निवेदनात म्हटले आहे.

You may have missed

error: Content is protected !!