वडिलांच्या कर्जापाई शेतकरी पुत्राची आत्महत्या मेरा खुर्द येथील घटना…

Screenshot_2025-12-19-19-49-04-48_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

चिखली (एकनाथ माळेकर जिल्हा प्रतिनिधी )चिखली तालुक्यातील मौजे मेरा खुर्द येथील अनिल गंगाराम उदार वय वर्ष 33 यांनी आपल्या वडिलांच्या गट नंबर 221 मेरा खुर्द येथील शेतीवर बँक ऑफ महाराष्ट्र याचे वडिलांनी कर्ज काढले होते तसेच अनिल यांनी सुद्धा प्रावेट सोसायटीचे कर्ज काढले होते त्याचे हप्ते भरणे निसर्ग च्याआसमानी आणि सुलतानी संकटामुळे व शासनाच्या धोरणामुळे शेतीही तोट्यात जात असल्यामुळे त्याला ते कर्ज भरणे अशक्य झाले होते आज शेती मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदार आहे आणि त्यामुळेच शेतकरी हे टोकाचे पाऊल उचलत आहे वडिलांच्या कर्जापाई अनिल उदार यांनी आपली जीवन यात्रा आपल्या गट नंबर 221 मध्ये जाऊन गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे तसेच त्यांनी एका खाजगी सोसायटीचे सुद्धा दीड लाख रुपये कर्ज काढले होते ते त्याला भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे अनिल हा एक होतकरू मुलगा होता परंतु कर्ज त्याला त्यामधून बाहेर येऊ देत नव्हते हे त्याच्या सतत मनात घुमत होते त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे दिसून येत आहे

You may have missed

error: Content is protected !!