सिंदखेड राजा येथे नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू; शेतकरी समाधानी

IMG-20251219-WA0077

सिंदखेड राजा( अनिल दराडे)महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हिवडाच बाजार समिती, सिंदखेड राजा येथे नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक व वेळेवर पार पडत आहे.खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आणलेल्या सोयाबीनचे मोजमाप, वजन व गुणवत्ता तपासणी तात्काळ करण्यात येत असून, मोजमाप पूर्ण होताच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची स्कॅन सहीत अधिकृत पावती त्वरित देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचत असून कोणतीही अडचण निर्माण होत नाही.नाफेड अंतर्गत खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, ट्रॉली व इतर वाहनांद्वारे आणलेल्या मालाचे नियमानुसार वजन करण्यात येत आहे. आजअखेर एकूण ६,२८५ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली असून, यामधून शेतकऱ्यांना सुमारे ५३ लाख २० हजार रुपयांचा लाभ मिळाल्याची माहिती देण्यात आली.

खरेदी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नसून, शेतकरी या व्यवस्थेवर समाधान व्यक्त करत आहेत. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व नाफेड अंतर्गत सुरू असलेल्या खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You may have missed

error: Content is protected !!