चिखली-जालना मार्गावरील झाडांच्या अडथळ्यांवर अखेर काम सुरू नागरिकांच्या निवेदनाला यश नॅशनल हायवे प्राधिकरणाची सफाई मोहीम सुरू

IMG-20251219-WA0079

चिखली(एकनाथ माळेकर जिल्हा प्रतिनिधी )चिखली -जालना नॅशनल हायवे 753A मार्गावरील झाडीमुळे सतत वाढणाऱ्या अपघातांना अखेर आळा घालण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे. मागील महिन्यात चिखली तालुक्यातील पत्रकार समाधान गाडेकर,युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी संयुक्तरित्या चिखली तहसीलद यांच्या कडे सादर केलेल्या निवेदनाचा परिणाम आता प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. अत्यंत गंभीर स्वरूपाचा या रस्त्यावरील झाडांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, प्रत्यक्षात असंख्य वाहन अपघातांचे कारण ठरत होता. परंतु नागरिकांच्या ठोस पाठपुराव्यानंतर अखेर प्रशासन जागे झाले असून, 19 डिसेंबर 2025 पासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने झाडे हटविण्याची मोहीम सुरू केली आहे.

चिखली ते जालना या मार्गावर विशेषतः रामनगर फाटा, बेराळा, मलगी, मुरादपूर परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तसेच डिव्हायडरवर काटेरी झुडपे व मोठ्या फुलझाडांनी रस्त्यावर झुकून वाहनचालकांच्या दृष्टी आड होणारा अडथळा निर्माण केला होता. या झाडांच्या अडथळ्यामुळे विशेषतः पहाटे व रात्री अपघाताची शक्यता वाढत होती. केवळ शक्यता नव्हे तर प्रत्यक्षात अनेक जीवघेणे अपघात या मार्गावर झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी नामांकित डॉक्टरांचा मृत्यू, तर अंकुश भनगे या तरुणाचा झालेला अपघात या परिस्थितीचे भयावह चित्र समोर आणणारा होता.

या घटनांनंतर नागरिकांनी प्रशासनाच्या लक्षात हा प्रश्न व्यापकपणे आणण्यासाठी निवेदन सादर केले. निवेदनात झाडांच्या फांद्या रस्त्यावर येत असल्याने वाहनांना योग्य दिशा मिळत नसल्याचे, साईनबोर्ड असूनही झाडांमुळे ते न दिसण्याचे आणि त्यामुळे वेगाने येणाऱ्या वाहनांना अचानक वळण लागत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्याचवेळी झाडांची कापणी न केल्यास मोठा जनआंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला होता.

अधिकारी वर्गाने या निवेदनाची दखल घेतली. नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली आणि परिस्थितीची गंभीरता मान्य केली. अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शक्करगे यांनी वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने तातडीची कारवाई आवश्यक असल्याचे मत लेखी स्वरूपात नोंदवले. या पाठपुराव्यानंतर नॅशनल हायवे प्राधिकरणाचे लक्ष त्याकडे वळवले. रस्त्याच्या मध्ये व दोन्ही बाजूला मोठमोठी झाडे झाल्याने रात्रीच्या वेळी नीलगाई या प्रकाशाच्या वेगाने वाहनाच्या अंगावर येतात आणि अपघात घडतात
या सर्व पाठपुरावा, 19 डिसेंबर 2025 पासून झाडे हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी प्रथम धोकादायक ठिकाणांवर सफाई कार्य सुरू केले आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून वाहतूक सुरक्षिततेसाठी हा निर्णय असल्याचे मत व्यक्त केले आहे.

लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारा हा उपक्रम निश्‍चितच कौतुकास्पद आहे. चिखली तालुक्यातील नागरिक, समाजसेवक, पत्रकार, राजकीय नेते ,कार्यकर्त्यांनी केलेला सलग पाठपुरावा लोकशाहीत जनतेचा आवाज किती परिणामकारक ठरू शकतो हे दाखवणारा आहे.
दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी रामनगर फाट्याजवळ नॅशनल हायवेचे अधिकारी चव्हाण यांनी दोन जेसीबीच्या सहाय्याने वाहतुकीला अडथळा करणारी झाडे काढण्यास सुरुवात केली यावेळी नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड ठाणेदार शक्करगे , पत्रकार समाधान गाडेकर , युवा युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर, क्रांतिकारी शेतकरी संघटना नेते विनायक सरनाईक, पत्रकार उद्धव थुट्टे पाटील, कृष्णा मिसाळ ,ह.भ.प.पंढरीनाथ महाराज गाडेकर, अरुण वराडे, एकनाथ माळेकर, वैजिनाथ शितोळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते

You may have missed

error: Content is protected !!