मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज, कडेकोट पोलीस सुरक्षा व्यवस्था असेल तैनात – निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे

IMG-20251220-WA0022


सिंदखेडराजा (अनिल दराडे) मा.राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेल्या वेळेनुसार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी नगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रिया मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली.

सिंदखेडराजा नगर परिषद निवडणुकीमध्ये एकूण 21 मतदान केंद्रे होते,एकूण 10 प्रभाग साठी एकूण 20 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी विक्रमी असे 85.08% मतदान पार पडले होते.

आज मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांनी सर्व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. पोलीस निरीक्षक आशिष इंगळे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांनी मतमोजणी साठी करण्यात आलेल्या सर्व सुरक्षा व्यवस्थेबद्दल सर्व माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिली. मतमोजणी करिता कसल्याही प्रकारची हलगर्जी होणार नाही यासाठी सर्व पोलीस प्रशासन सज्ज असून सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी सांगितले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे, मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, PI आशिष इंगळे, PSI बालाजी सानप, श्रावण डोंगरे, शहर अभियंता हामीद काझी, नितीन बोडखे, ग्राम महसूल अधिकारी राहुल देशमुख इत्यादी उपस्थित होते.

उमेदवारांना दिलेल्या काही महत्वाच्या सूचना

1) रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता EVM स्ट्रॉंग रूम उघडायची असल्याकारणाने सर्व उमेदवारांनी नगर परिषद कार्यालय येथे उपस्थित राहायचे आहे.

2) रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता नगरपरिषद सभागृह येथे मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

3) मतमोजणी साठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकरिता एकूण चार मतमोजणी प्रतिनिधी निवडता येतील तर नगरसेवक पदाच्या उमेदवारांकरिता फक्त एक मतमोजणी प्रतिनिधी निवडता येईल.

4) मतमोजणीसाठी एकूण चार टेबल लावण्यात येणार आहेत, टेबल क्रमांक एक वरती प्रभाग क्रमांक एक ची मतमोजणी होईल, टेबल क्रमांक दोन वरती प्रभाग क्रमांक दोनची मतमोजणी होईल, टेबल क्रमांक तीन वरती प्रभाग क्रमांक तीनची मतमोजणी होईल, टेबल क्रमांक चार वरती प्रभाग क्रमांक चार ची मतमोजणी होईल.

5) हे चार प्रभाग झाल्यानंतर परत टेबल क्रमांक एक वरती प्रभाग क्रमांक पाच ची मतमोजणी होईल, टेबल क्रमांक दोन वरती प्रभाग क्रमांक सहा चे मतमोजणी होईल, टेबल क्रमांक तीन वरती प्रभाग क्रमांक सातची मतमोजणी होईल, टेबल क्रमांक चार वरती प्रभाग क्रमांक आठ ची मतमोजणी होईल.

6) आठ प्रभाग पूर्ण झाल्यानंतर परत टेबल क्रमांक एक वरती प्रभाग क्रमांक नऊ ची मतमोजणी होईल, टेबल क्रमांक दोन वरती प्रभाग क्रमांक दहाची मतमोजणी होईल.

7) नगराध्यक्ष हे पद जनतेतून निवडून येणार असल्यामुळे प्रत्येक प्रभागांमधील मतमोजणी सोबतच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची सुद्धा मतमोजणी सूरू राहील आणि शेवटच्या प्रभाग क्रमांक दहा सोबतच नगराध्यक्ष पदाची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल.

8) सर्व उमेदवारांनी तसेच त्यांच्या सर्व मतमोजणी प्रतिनिधींनी निवडणूक प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करुन सहकार्य करायचे आहे.

9) काही समस्या असतील तर आमच्याशी संपर्क करा आपल्या समस्या नक्कीच सोडवाल्या जातील.

मतमोजणी साठी नगर परिषद निवडणूक विभागाकडून सर्व उमेदवारांना शुभेच्छा..

You may have missed

error: Content is protected !!