कर्तव्यदक्ष गट शिक्षणाधिकारी स्वप्नील निकम यांनी देऊळगाव कोळच्या शाळेच्या बोलक्या भिंती या अतिशय स्तुत्य उपक्रमाची पाहणी करुन उपक्रमाचे केले तोंडभरून कौतुक

Screenshot_2025-12-20-17-35-59-62_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7


सिंदखेडराजा (अनिल दराडे)”एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ” जगदगुरु तुकोबांच्या उक्तीने प्रेरीत होउन, एका विशिष्ट ध्येयाने जि.प.उच्च प्राथमिक केंद्र शाळा देऊळगावकोळचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. गाडे सर व सर्व शिक्षकवृंद यांनी शाळेचे रंगरूप पालटण्याचा ध्यास घेतला आणि या उपक्रमास समर्थ साथ मिळाली ती सर्व सन्माननीय गावक-यांची.

शाळेच्या माजी विद्यार्थी संघाचा मेळावा घेण्याचा माणस जाहीर केला आणि हाकेला ओ देऊन सर्व माजी विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात उपस्थित झाले. शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी सर्वांचे स्वागत करुन सर्वांसमोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आणि बघता बघता माझ्या शाळेचे रुप पालटायचंच हा निर्धार पक्का झाला.

सोबतीला सर्व सन्माननीय गावकरी, गावपातळीवरील सर्व आजी माजी कर्मचारी यांची समर्थ साथ. बघता बघता उपक्रम प्रत्यक्षात आला. एक आश्वासक निधीची उभारणी झाली. शाळेचे रुप पालटले, भिंती बोलक्या झाल्या आणि जणु शाळा माझ्याशी बोलतेय हा भास सगळ्यांना व्हायला सुरुवात झाली. हा हा म्हणता बातमी कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा.स्वप्नीलजी निकम यांच्या कानावर गेली आणि तात्काळ दखल घेऊन त्यांनी सदर शाळेला केंद्रप्रमुख श्री. डिघोळे सर व केंद्रप्रमुख श्री. नागरे सर यांना सोबत घेऊन भेट दिली. बोलक्या भिंती आणि कामाचे स्वरूप पाहुन मा.स्वप्नीलजी निकम सरांनी व उपस्थित सर्वांनी सन्माननीय मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृदांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

तुम्ही करत असलेल्या स्तुत्य उपक्रमास समर्थ साथ देण्याचे वचन दिले. या उपक्रमाच्या यशस्वीतेचे सर्व श्रेय सन्माननीय मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी सर्व सन्माननीय गावकरी, शाळेचे सर्व माजी विद्यार्थी, सर्व सन्माननीय पालक व गावपातळीवरील सर्व प्रतिष्ठीत नागरीकांना दिले आणि यापुढेही विद्यार्थी व शाळेच्या हिताचे कार्य अव्याहतपणे करत राहण्याचे आश्वासन दिले.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा देऊळगावकोळच्या बोलक्या भिंतींना मा.गटशिक्षणाधिकारी श्री.स्वप्नील निकम यांनी भेट दिल्याने नक्कीच या कामाची दखल प्रशासन घेईल आणि अजून मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम पूर्ण तालुक्यामध्ये कश्या पद्धतीने राबविता येईल यासाठी पुढील काळात नियोजनबद्ध उपक्रम राबवण्याचा निर्धार निकम साहेबांनी केला आहे.

मातृतीर्थ सिंदखेड राजाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे, या आपल्या तालुक्याला कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी लाभलेला आहे, तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा अजून उंचीवर घेऊन जाण्यासाठी निकम साहेब नक्कीच प्रयत्न करतील अशी आपल्याला सर्वांना खात्री आहे.

You may have missed

error: Content is protected !!