दिमाखदार राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे ३० डिसेंबर रोजी साखरखेर्डा येथे वितरण !दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
बुलढाणा (सचिन खंडारे) साखरखेर्डा ,ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथील सांस्कृतिक क्षितिजावर लवकरच एक तेजस्वी पर्वणी अवतरणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पावन जयंतीनिमित्त, तसेच समाजभूषण, पर्यावरणप्रेमी, वृक्षमित्र दिवंगत मधुकरराव खंडारे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून व समाजभूषण मा. अर्जुनराव गवई यांच्या जन्मदिनी, एका राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे मा. सचिन खंडारे पत्रकार संपादक,यांनी भव्य आयोजन केले आहे.
शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता, वैद्यकीय, रंगभूमी, कला, नाट्य आणि राज्यभरातील इतर विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाने मोलाची भर घालणाऱ्या गुणवंत व्यक्तींकडून या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद लाभला. विहित दिनांकापर्यंत निवड समितीकडे अगदी शेकडो प्रस्ताव प्राप्त झाले होते, ज्यात प्रत्येक परिचय प्रस्ताव हा कार्याची व कर्तृत्वाची साक्ष देणारा होता.
परंतु, निवड समितीचे अध्यक्ष साहित्यिक, लेखक, समीक्षक विकास सुखधाने आणि मुख्य आयोजक मा. सचिन खंडारे पत्रकार यांच्या वतीने गुणांकन व निर्धारित निकषांच्या आधारे, या सर्वार्थाने भाग्यवंत सारस्वतांची व गुणीजनांची राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी अंतिम निवड करण्यात आली आहे.
या सर्व भाग्यवंत सारस्वतांना आणि गुणिजनांना सन्मानाने गौरवण्यासाठी हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिनांक येत्या ३० डिसेंबर २०२५ मंगळवार रोजी सकाळी १० वाजता अनिकेत सैनिक स्कूल शेंदुरजन रोड
साखरखेर्डा येथे संपन्न होणार आहे.
प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार गौरव
या दिमाखदार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मा. मनोज भाऊ कायंदे (आमदार, सिंदखेडराजा विधानसभा), डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. सिद्धार्थ खरात साहेब (आमदार, मेहकर विधानसभा), मा. रविकांतजी तुपकर साहेब (माजी राज्यमंत्री दर्जा व संस्थापक अध्यक्ष, शेतकरी संघटना), मा. योगेश जाधव (युवा नेते, शिवसेना, मेहकर) आणि मा. शशिकांत खेडेकर साहेब (माजी आमदार, सिंदखेडराजा) यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या शुभहस्ते या सर्व भाग्यवंत सारस्वतांचा यथोचित सत्कार व सम्मान करून त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मा. सचिन अंबादास काटे (संस्थापक अध्यक्ष, अस्तित्व फाउंडेशन) हे भूषवतील.
वक्त्यांचे वैचारिक मार्गदर्शन
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मा. संजय खडसे (उपजिल्हाधिकारी, सिंदखेडराजा), मा. विलास बड़े (संपादक, लोकमत आयबीएन), मा. भाई कैलास सुखधाने (भीमशक्ती राज्य नेते)
दैनिक भारत संग्राम चे मुख्य संपादक डॉक्टर माधव हिवाळे
आणि मा. गजेंद्र गवई (लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी)
हे आपले वैचारिक मार्गदर्शन करतील.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मा. रमेश ठोसरे (मुख्याध्यापक, जिजामाता विद्यालय, साखरखेर्डा) आणि संतोष दसरे (प्राचार्य, एस. एस. जुनियर कॉलेज, साखरखेर्डा) हे असतील. कार्यक्रमाचे ओजस्वी सूत्रसंचालन वैशाली तायडे आणि स्नेहल सरकटे (बुलढाणा) यांच्या वाणीतून होणार आहे.
या ज्ञानयज्ञ सोहळ्यास, सर्व गुणीजनांनी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे विनम्र आवाहन निमंत्रक तथा मुख्य आयोजक मा. सचिन मधुकरराव खंडारे पत्रकार आणि माजी केंद्रप्रमुख, पत्रकार दिलीपराव खंडारे ‘ मुख्य निवड समिती अध्यक्ष विकास सुखधाने यांनी केले आहे.
